मुख्यमंत्री-युवा-कार्य-प्रशिक्षणार्थ्यांचा-लातूर-जिल्हाधिकारी-कार्यालयावर-धडकला-मोर्चा
मुख्यमंत्री-युवा-कार्य-प्रशिक्षणार्थ्यांचा-लातूर-जिल्हाधिकारी-कार्यालयावर-धडकला-मोर्चा
लातूर : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित
युवकांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा लवकरच मुंबई येथील आझाद मैदानावर
मुंडनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिला
आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित
करताना बोलत होते. .
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण युक्तांचा कालावधी वाढवून त्यांच्या
मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी, शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10 टक्के
आरक्षणाची ठेवण्यात यावे आणि मानधनामध्ये वाढ करण्यात यावी आणि ते वेळेवर
देण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी आज 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11
वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून लातूरच्या जुने जिल्हाधिकारी
कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व बालाजी पाटील
चाकूरकर, जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदले यांनी केले. या मोर्चात हजारोच्या
संख्येने प्रशिक्षणार्थी युवक युवती यांचा समावेश होता. मोर्चामध्ये
आंदोलनाची पुढील दिशा देखील घोषित केली. यामध्ये आंदोलनाचा सहा कलमी
कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये
पहिला टप्यात लातूर जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांच्या घराला घेराव
घालण्यात येणार आहे.
दुसरा टप्यात मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्यात महाराष्ट्रामधील प्रत्येक तहसील कचेरीवर धरणे आंदोलन
करण्यात येईल. चौथ्या टप्यात मुख्यमंत्र्यांच्या घरावरती घेराव आणि
पाचव्या टप्प्यात 5000 प्रशिक्षणार्थ्यांचा मुंडन आंदोलन आझाद मैदानावर
करण्यात येईल.
सहाव्या टप्प्यात मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार आहे. जोपर्यंत
युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे.
या मोर्चाचे ग्राव, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सुक्ष्म
नियोजन केले होते. या मोर्चामध्ये किमान अडीच हजार प्रशिक्षणार्थी युवक व
युवती सहभागी झाले होते. मोर्चाच्या सभेचे सूत्रसंचालन गोविंद टोम्पे
यांनी केले यावेळी अनेक प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यामध्ये सहायक जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे ,उपाध्यक्ष
शुभम पांचाळ ,सहसचिव सुजित कुमार शिंदे, महिला उपाध्यक्ष कविता बडोरे ,
अतुल सातपुते ,सरोजा भालेराव ,आकाश सावंत, जी वी माने , सुशांत
भांडारकोटे इत्यादी प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
त्याचबरोबर या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या संदर्भात विविध संघटना
लातूर यांनीही जाहीर पाठिंबा व्यक्त केला याचबरोबर विद्यार्थी हक्क कृती
समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आकाश सावंत यांनीही जाहीर पाठिंबा व्यक्त
केला. याचबरोबर भीम योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष
राजकुमार घोडके यांनीही या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0