: शंभर मीटर पर्यंतचाच अर्धवट ओबडधोबड रस्ता करून केला खोळंबा बीडीओ व ग्रामसेवकाचा हलगर्जीपणा
: शंभर मीटर पर्यंतचाच अर्धवट ओबडधोबड रस्ता करून केला खोळंबा बीडीओ व ग्रामसेवकाचा हलगर्जीपणा
लातूर : निलंगा तालुक्यातील शिऊर ते नदीवाडी हा दोन वर्षांपासून मंजूर
असलेल्या पाणंद रस्ता होण्यासाठी शिऊरच्या शेतकऱ्यांनी निलंगा पंचायत
समितीसमोर अनेकवेळा उपोषण केले. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचे काम झाले
नाही. त्यामुळे लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
रस्त्याचे काम सुरु केल्याचे नाटक करण्यात आले. 28 फेब्रुवारी पर्यंत
रस्ता करून देतो म्हणून आश्वासन देण्यात येऊन उपोषण सोडवण्यात आले. मात्र
शिऊर ते नदीवाडी पाणंद रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेच नाही. त्यामुळे
संपूर्ण रस्ता बांधकाम नीट करून द्यावे, या मागणीसाठी पुन्हा लातूर
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. वाघ यांना
शेतकऱ्यांनी 5 मार्च रोजी निवेदन देऊन जर रस्ता झाला नाही तर पुन्हा 17
मार्च पासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल,
असा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. सदर रस्त्याच्या कामात दिरंगाई
करणाऱ्या संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवकविरुद्ध कार्यवाही करावी.
या रस्त्याच्या कामात राजकारण करणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करून सदरचा
रस्ता तात्काळ करून देण्यात यावा. जो पर्यंत रस्त्याचे काम होणार नाही,
तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील. असा इशारा शेतकरी अरुण अष्टुरे,
नामदेव तुगावे, शेषेराव बिरादार, दिलीप सूर्यवंशी, सौ. सरोजा अष्टुरे,
सौ. वत्सलाबाई सूर्यवंशी, भरत सूर्यवंशी, सुशीलाबाई अष्टुरे, हिरकणबाई
तुगावे, शिवराज अष्टुरे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0