बारदाना उपलब्ध करुन देण्याची आ.कराड यांची मागणी
बारदाना उपलब्ध करुन देण्याची आ.कराड यांची मागणी
लातूर दि. शेतकऱ्यांना दिलासा देता यावा यासाठी राज्यातील महायुती शासनाने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सुरु केलेल्या केंद्रांना मुदतवाढ देवून सोयाबीन खरेदी केंद्रावर गरजेनुसार बारदाना उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रीजी फडणवीस आणि राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा असून जिल्हायातील बहुतांशी शेतकरी सोयाबीनचे पिक मोठया प्रमाणात घेतात. या शेतकऱ्यांना दिलासा देता यावा यासाठी राज्यातील महायुती शासनाने हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केली आहेत. या निर्णयामुळे जिल्हाभरात जवळपास पन्नास सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाले. त्यापैकी सहा खरेदी केंद्राच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी केली जात आहे. सदरील सोयाबीन खरेदीची मुदत १२ जानेवारी २०२५ रोजीपर्यंतच असून बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही घरातच आहे.
सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या केवळ दहा ते पंधरा टक्केच शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरेदी केंद्राला सोयाबीन दिले आहे. ऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीन शेतकऱ्यांकडेच आहे. यावर्षी पाऊस मुबलक झाल्याने सोयाबीन पिकातील ओलावा, रब्बी हंगामाची लगबग, तूर व इतर पिकातील फवारणी यामुळे सोयाबीनच्या राशी करण्यास शेतकऱ्यांना विलंब लागला. असे नमुद करुन आ. रमेशअप्पा कराड यांनी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सोयाबीन खरेदी केंद्र बरेच दिवस बारदाना अभावी बंद होते. अनेक केंद्रावर सातत्याने बारदान्याचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला
प्रत्येक सोयाबीन खरेदी केद्रास गरजेनुसार बारदाना उपलब्ध करुन द्यावा त्याचबरोबर खरेदी केलेल्या सोयाबीनसाठी गोडाऊनची उपलब्धता करावी शिल्लक असलेले सोयाबीन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने सोयाबीन खरेदी केंद्राची तात्काळ मुदत वाढ देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रीजी फडणवीस आणि राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0