वैज्ञानिक प्रगती : शास्त्रज्ञांचा वारसा आणि तरुणांच्या नवनिर्मितीची मशाल - डॉ.गजानन बने
वैज्ञानिक प्रगती : शास्त्रज्ञांचा वारसा आणि तरुणांच्या नवनिर्मितीची मशाल - डॉ.गजानन बने
लातूर : वैज्ञानिक प्रगती ही शास्त्रज्ञाचा वारसा आहे आणि तरुण मनांमध्ये नवनिर्मितीची मशाल पेटवते.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने यांनी केले.
दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी कॅरी बँक्स मुलिस यांच्या ८० व्या जयंतीसाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,मराठी विभागातील डॉ.रामशेट्टी शेटकार आणि डॉ.कोमल गोमारे यांनी मुलिस यांचा आदर व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला वंदन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जैवतंत्रज्ञान विभागातील प्रा.सुभद्रा परगे यांनी प्रस्तावना सादर केली,ज्यामध्ये त्यांनी कॅरी बँक्स मुलिस यांच्या वैज्ञानिक योगदानाचा सखोल परिचय दिला.
कॅरी मुलिस हे अमेरिकन बायोकेमिस्ट होते,ज्यांनी पॉलिमरेझ चेन रिएक्शन (पीसीआर) तंत्राच्या शोधामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या शोधासाठी त्यांना १९९३ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.त्यांच्या कार्यामुळे पीसीआर तंत्र बायोकेमिस्ट्री आणि आण्विक जीवशास्त्राच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल ठरला आहे.तसेच,अॅंथ्रॅक्सवर लस तयार करण्यासाठी पीसीआरच्या वापराबद्दल त्यांना अमेरिकन सरकारने पाच लाख डॉलरचे मानधन दिले.त्यांच्या योगदानामुळे रेण्वीय जीवविज्ञानाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.
डॉ.रामशेट्टी शेटकार असे म्हणाले की,वैज्ञानिकांची जयंती साजरी केल्याने वैज्ञानिकांच्या परिवर्तनात्मक योगदानाची ओळख होते,ज्यामुळे भविष्यातील पिढीला संशोधनात्मक ज्ञानाच्या शोधात मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते,वैज्ञानिक हेच भावी पिढीसाठी आदर्श दिपस्तंभ आहेत,म्हणून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांप्रमाणे ' मरावे पण किर्तीरुपी उरावे ' असे संशोधन कार्य करावे,असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच या कार्यक्रमात डॉ.गजानन बने आणि डॉ.रामशेट्टी शेटकार यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या पाऊलांवर पाऊले टाकण्यासाठी प्रोत्साहित केले आणि वादविवाद,वकृत्व,भाषण व इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले.ते म्हणाले,"दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही शैक्षणिक किंवा अतिरिक्त अभ्यासक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रचंड क्षमता आहे." त्यांनी महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमात डॉ.फिरदौस बिरादार, प्रा.अवंती बिडकर,प्रा.स्वरूप गावकरे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी अश्विनी ढवारे तसेच दयानंद विज्ञान वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपस्थिती होती.हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय आणि वैचारिक विकासासाठी एक मोठे पाऊल ठरले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0