गंगापूरच्या लोकनियुक्त सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीला हायकोर्टाची स्थगिती; पाच सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
गंगापूरच्या लोकनियुक्त सरपंचाच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीला हायकोर्टाची स्थगिती; पाच सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
लातूर: तालुक्यातील गंगापूर गावचे लोकनियुक्त सरपंच शितल बलभीम गायकवाड यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या 11 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता त्या ठरावावरती दिनांक 24 .2 .2025 रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गंगापूर ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे त्यांच्या सदस्यत्वावर आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंगापूर ग्रामपंचायत च्या पाच सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे अपात्र करण्याचा नोटीस काढली आहे. तर आज सोमवारी गंगापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या बैठकीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे.ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या अपात्रतेवरती 10 मार्च 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या पाच ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.डिसेंबर 2022 रोजी गंगापूर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या मात्र त्यानंतर एक वर्षाच्या आत म्हणजेच डिसेंबर 2023 पर्यंत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत होती मात्र या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही. तसेच निवडणूक विभागाकडून अपात्र सदस्यांना वारंवार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.दरम्यान गंगापूर ग्रामपंचायतीतील पाच सदस्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून वारंवार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्याच बरोबर तहसीलदार लातूर यांच्या कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्रावर सुनावणेही घेण्यात आली होती. मात्र या सुनावणीला ग्रामपंचायतीतील सदस्य उपस्थित न राहिल्याने आणि जात वैधता प्रमाणपत्राची याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्यानंतर गंगापूरच्या पाच ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागणार आहे..
चौकट:
अपात्र असलेल्या सदस्यांना हाताशी धरून माझ्यावर अविश्वास ठराव-सरपंच शितल गायकवाड
सन 2022 रोजी मी गंगापूर गावची लोकनियुक्त सरपंच झाले. त्यानंतर गेल्या वर्षभरात मला माझ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्याचबरोबर मी केलेल्या कामात नेहमी अडथळा आणण्याचे काम ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वेळोवेळी केलेले आहे. गावातील विकासाची कामे संबंधित ठिकाणी न करता त्याचा निधी दुसऱ्या ठिकाणी वापरून गैरव्यवहार करण्यात आलेला आहे. सर्व सदस्यांचे बहुमत असल्याने त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार केला आहे.. पॅनल प्रमुखांनी अपात्र असलेल्या सदस्यांना हाताशी धरून माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल आहे. असे गंगापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शितल बलभीम गायकवाड यांनी सांगितला आहे...
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0