लातूर शहरातील ए.एस. हॉस्पिटलचे उद्घाटन
लातूर शहरातील ए.एस. हॉस्पिटलचे उद्घाटन
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते खासदार डॉ. शिवाजी
काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरातील ए.एस. हॉस्पिटलचे उद्घाटन
लातूर :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवार दिनांक १५
एप्रिल रोजी सायंकाळी लातूर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील डॉ. सय्यद
मोहम्मद यांच्या पुढाकारातून उभारलेल्या ए. एस. हॉस्पिटलचे (त्वचेचा व
डोळ्यांचा दवाखाना) उद्घाटन करण्यात आले. तसेच माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर सय्यद मोहम्मद यांच्या बहीण सईदा
अहमद यांनी लिहिलेल्या ‘मुकदमा एक शर्त है’, ‘प्रतीक्षा अब खिडकीयो से
नही दिखती’, ‘रात तीन घडी’ या उर्दू पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर
उदय मोहिते, लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप शहा,
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अशोक
गोविंदपुरकर, लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस सेलचे अध्यक्ष
एडव्होकेट फारुक शेख, हाजी अब्दुल सत्तार रहीम, डॉक्टर मुजीब फारुकी,
डॉक्टर आलिम सय्यद, अब्दुल वहाब सय्यद, अहाद सय्यद, शौकत अली मौलाना,
डॉक्टर अशोक पोद्दार, डॉक्टर कल्याण बरमदे, इस्माईल शेख, सादिक पटवारी,
अमजद पठाण आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, सय्यद कुटुंबीय,
मित्रपरिवार उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0