महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. दिलीप नागरगोजे यांना प्रदान.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. दिलीप नागरगोजे यांना प्रदान.
लातूर: इंडियन कॉन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, नवी दिल्ली पुरस्कृत महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ४० वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक: २६ ते २८ डिसेंबर २०२४ आयोजित केले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन म्हणून मा. प्रा. डॉ. सुरेश गोसावी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी केले .
या अधिवेशनात महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद पुरस्कृत पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.डॉ. एस. एस. पिटके पुरस्कृत प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात आपल्या तत्त्वनिष्ठ वाटचालीचा संदर्भ लक्षात घेऊन उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांना रोख पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन
सन्मानित करण्यात आले. तत्त्वज्ञानाच्या पृष्ठभूमीवर ध्येय-पंथाकडे जाणारी पाऊले नेहमीच प्रशंसनीय ठरतात. त्यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील अतिशय छोट्या गणल्या जाणाऱ्या महाळंग्रावाडी गावात एका आर्थिकदृष्ट्या विपन्न परंतु संस्कारक्षम वारकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण करून लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेतले. याच महाविद्यालयाने त्यांना उदात्ततेचा वारसा दिला. प्रख्यात विचारवंत प्राचार्य नागोराव कुंभार आदी अनेक नामवंताच्या सानिध्यात व्यक्तिमत्त्वाने आकार घेऊन भविष्याकडे यशस्वी वाटचाल सुरूवात केली.
मराठवाड्यात शिक्षण पंढरीच्या नावाने ख्यातनाम दयानंद कला महाविद्यालयात तत्त्वज्ञानाच्या शिक्षक पदी नेमणूक झाली. महाविद्यालयाची यशस्वी परंपरा, अनेक दिग्गज सहयोगी प्राध्यापकांची मांदियाळी, सुसज्ज ग्रंथालय यामुळे आतील उर्मी लेखन कार्याकडे वळती झाली.एकंदर सात ग्रंथाची रचना तसेच आधुनिकतेची कास धरल्याने युट्युब सारख्या प्रचलित माध्यमांद्वारे तत्त्वज्ञान विषयाची मांडणी विद्यार्थी व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरली. आपल्या द्वारे निर्मित ग्रंथसंपदा नागपूर व नांदेड विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात ठेवल्या. केवळ ज्ञानलालसे पोटी पीएचडी व सेट या उच्चविद्याविभूषित पदव्या संपादित केल्या. वर्तमानपत्रात वेळोवेळी प्रकाशित लेख, मासिकात लेखन, विद्यार्थ्यांची परिघाबाहेर जाऊन केलेली भरघोस मदत या सगळ्यांचा परिपाक म्हणून अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद महाराष्ट्राच्या विचारांवर तत्त्वज्ञानाचे कोंदण करून उदात्त समाजाभिमुख लोक निर्मितीचे कार्य करते. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या वतीने दिला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी आपली निवड करून समारंभपूर्वक वितरीन केले.
या अधिवेशनात संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षपदी मा. ॲड.सदानंद फडके, संमेलनाध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, नियामक मंडळ अध्यक्ष मा. ॲड. एस. के. जैन व प्रमुख उपस्थिती मा.प्रा. डॉ. नमिता निवाळकर, मा. श्री गजेंद्र पवार, मा. श्री केशव वझे, मा. प्रा. डॉ. राधिका इनामदार, मतप अध्यक्ष डॉ. सुनीलदत गवरे व कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अमन बगाडे व अनेक तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.
या पुरस्कारा बद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव श्री. रमेशजी बियाणी, उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष श्री ललितभाई शहा, संयुक्त सचिव श्री विशाल लाहोटी तसेच प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. सुनील साळुंके, पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दिक्षित, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. गोपाल बाहेती, स्टाफ सचिव सुरेश क्षिरसागर, कार्यालयीन अधीक्षक श्री संजय व्यास, डॉ दयानंद शिरूरे ,प्रा. दशरथ ननवरे यांनी अभिनंदन केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0