आ. कराड यांच्याकडे पाथरवाडी अध्यात्मिक पीठ ते मुरढव रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
आ. कराड यांच्याकडे पाथरवाडी अध्यात्मिक पीठ ते मुरढव रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
लातूर : रेणापूर तालुक्यातील मौजे पाथरवाडी येथील श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठ ते मुरढव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडे करण्यात आली आहे.
पाथरवाडीच्या श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठाला ग्रामीण तीर्थक्षेत्राचा ' क ' दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या देवस्थानाकडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु रस्ता खराब असल्याने भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर गावातील सार्वजनिक स्मशानभूमी आहे. त्याचा अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गावातील सर्व सांडपाणी अध्यात्मिक पीठासमोर येत असल्याने या भागात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.त्याकरिता मुरढव ते पाथरवाडी या अडीच किमी. रस्त्याचे डांबरीकरण आणि या मार्गावरील दोन पुलांचे काम लवकरात लवकर करून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाच्या माध्यमातून या अध्यात्मिक पीठ परिसरातील सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी अंदाजे २५ लाख, अध्यात्मिक पीठ परिसरात संरक्षक भिंत बांधण्यासाठी २५ लाख, अध्यात्मिक पीठ परिसरात पाणी पुरवठा पाईपलाईनसाठी २० लाख, अध्यात्मिक पीठ परिसरात सोलर पथदिवे बसवण्यासाठी १५ लाख, पार्किंगच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट करण्यासाठी ८५ लाख, श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठ परिसरात ज्येष्ठ नागरिक व भाविक भक्तांना बसण्यासाठी सिमेंटचे बाकडे बसविण्यासाठी १६ लाख, श्री महादेव आणि हनुमान मंदिर समोरील ६०० फुटांची सिमेंट काँक्रीटची बंदिस्त नाली करण्यासाठी ३० लाख आणि अध्यात्मिक पीठ परिसरात भक्त निवासची उभारणी करण्यासाठी ४० लाख असे एकूण १७८ लाखांच्या विकास कामांना मंजुरी मिळवून देण्याची मागणीही आ. कराड यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन देताना अध्यात्मिक पिठाचे अध्यक्ष सुहास गोवर्धन, उपाध्यक्ष रघुनाथ आराध्ये, नवनाथ मद्दे मामा यांची उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0