इमारत व इतर बांधकाम कामगारांना प्रलंबित लाभ देण्याचे दिले आश्वासन
इमारत व इतर बांधकाम कामगारांना प्रलंबित लाभ देण्याचे दिले आश्वासन
लातूर - मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व इमारत व इतर
कामगार कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करावी, इमारत व इतर बांधकाम
कामगारांसाठीचे बंद करण्यात आलेले ऑनलाईन पोर्टल पूर्ववत सुरु करण्यात
यावे, बांधकाम कामगारांना 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे,
प्रलंबित नोंदणी नूतनीकरणाचे अर्ज तात्काळ मंजूर करावेत, 6 लाख रुपये
घरकुल कर्ज मंजूर करण्यात यावे या व इतर मागण्यासाठी लोकसत्ता युवा
श्रमिक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इलाही शेख यांच्या
नेतृत्वाखाली 23 जानेवारी सकाळी 10 वाजल्यापासून लातूरच्या जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र दुपारी 2वाजता कामगार सह
आयुक्त मंगेश झोले यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन बांधकाम
कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या उपोषण आंदोलनातील त्यांच्या
अधिकारात असलेल्या मागण्या मंजूर केल्या. तसेच ऑनलाईन पोर्टल सुरु
करण्याबाबत शासन स्तरावर पाठपरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे सदरचे
उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी
कार्यालयातील संबधीत अधिकारी, लोकसत्ता युवा श्रमिक संघटनेचे संस्थापक
अध्यक्ष इलाही बशीरसाब शेख, शहरध्यक्ष आसिफ निचलकर, कामगार जिल्हाध्यक्ष
इरफान कुरेशी,अब्दुल पठाण, किरण राठोड, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0