लातूर येथील विभागीय महसूल आयुक्तालयासाठी सर्व राजकीयपक्ष व संघटनाची वज्रमुठ
लातूर येथील विभागीय महसूल आयुक्तालयासाठी सर्व राजकीयपक्ष व संघटनाची वज्रमुठ
लातूर : गेली अनेक वर्षापासून मराठवाडयातील दुसरे स्वतंत्र होणारे महसूल
आयुक्त कार्यालय, लातूर येथेच व्हावे म्हणून सातत्याने मागणी केली जात
आहे. ही मागणी न्यायाची, हक्काची आणि गुणवत्तेची आहे, एवढेच नाही तर
मराठवाडयाच्या संपूर्ण विकासाच्या दृष्टीनेसुध्दा योग्य असुन
सद्यस्थितीमध्ये लातूर येथे प्रामुख्याने शिक्षण, सहकार, कृषी, पणन,
कामगार, उद्योग, धर्मादाय अशा विविध महत्वपूर्ण खात्यांची विभागीय
कार्यालय कार्यरत
आहेत आणि या कार्यालयाशी लातूर सोबत हिंगोली, परभणी, नांदेड,
धाराशिव, बीड हे जिल्हे संलग्न आहेत, म्हणून महाराष्ट्र शासनाने लातूर
येथे महसूल विभागीय आयुक्तालय स्थापन करावे, या मागणीचा पाठपुरावा व
पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन बाबासाहेब परांजपे
वाचनालय येथे करण्यात आले होते. समितीचे कार्याध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे
यांनी मागणीसाठी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री यांची शिष्टमंडळाची भेट
घेण्याची आश्वासन दिले आहे, असे सांगुन या बैठकीत प्रामुख्याने माजी आ.
शिवाजीराव पाटील कव्हेकर, अशोक गोविंदपूरकर, अॅड. प्रदिप मोरे, मोईजभाई
शेख, प्रा. सुहास पाचपुते, अॅड. विजय जाधव, मोहन माने, अॅड. वसंत उगले,
अॅड. भारत साबदे यांनी विचार मांडले. या समितीचे निमंत्रक
अॅड. उदय गवारे लातूर, धाराशिव व बीड जिल्हयातील सर्व आमदार व
खासदारांना निवेदन देवून सदरील प्रश्न आमदारांनी विधीमंडळात मांडावा तसेच
लातूर येथील विविध विभागीय कार्यालयाचे लाभधारक यांनी महसूल आयुक्त
कार्यालयाची मागणी लावून धरावी यासाठी प्रयत्न केले जाईल, असे सांगितले.
विभागीय आयुक्तालयाच्या सर्वपक्षीय बैठकीस प्रामुख्याने अॅड. व्यंकट
बेद्रे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाई उदय गवारे, मोईज शेख, अॅड.
भारत साबदे, अशोक गोविंदपुरकर, अॅड.प्रदिप मोरे, अॅड. विजय
जाधव, प्रा. सुहास पाचपुते, प्रा. अनंत लांडगे, शिवाजी नरहरे, डॉ. बी.
आर. पाटील, अशोक कांबळे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, निळकंठ पवार, अॅड.
शेखर हवीले, प्रविण साळुंके, अॅड. शाहरुख पटेल, अॅङ चिमाजी बाबर, अॅड.
सुनिल गायकवाड, दिलीप आरळीकर, सुर्यकांत वैद्य, भिम दुनगावे, शंकर भोसले,
समिर पडवळ आदी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0