दयानंद विज्ञानच्या सामूहिक वाचन उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
दयानंद विज्ञानच्या सामूहिक वाचन उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
वाचन संकल्प महाराष्ट्राचा : दयानंद विज्ञानच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचनातून केला वाचनाचा संकल्प
वाचू आनंदे : शांतता.....दयानंद विज्ञान महाविद्यालय वाचत आहे
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील भाषा विभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०९ जानेवारी २०२५ रोजी ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' अंतर्गत सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सामूहिक वाचन करून दररोज अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.चंद्रशेखर स्वामी,इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित,हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार,ग्रंथपाल प्रा.किरण भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.युवराज सारणीकर असे म्हणाले की,जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन,श्रवण,लेखन आणि संभाषण ही चार कौशल्य आत्मसात केली पाहिजेत.कारण कोणत्याही क्षेत्रात या चार कौशल्याशिवाय करिअर घडूच शकत नाही.म.गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,म.फुले व राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श घेऊन अधिकाधिक वाचनातून ज्ञानसंपन्न,सुसंस्कृत,यशवंत,
कीर्तीवंत,एक सुजाण नागरिक व आदर्श माणूस बनले पाहिजे.वाचनाने बोलण्याचे धाडस,आत्मविश्वास,वाक् चातुर्य येते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जास्तीचे रममाण न होता आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वाचनातून केली पाहिजे.वाचनाने ज्ञानेंद्रिय परिपक्व होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते असेही ते म्हणाले.
डॉ.चंद्रशेखर स्वामी असे म्हणाले की,प्रत्येक विद्यार्थ्यांनी ग्रंथाला मित्र समजून ग्रंथालय ज्ञान मंदिराच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबर अवांतरही वाचन केले पाहिजे.मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार कथा,कविता,कादंबऱ्या,नाटक,
चरित्र-आत्मचरित्र,प्रवासवर्णन आदि साहित्य वाचून सर्वगुण ज्ञानसंपन्न बनले पाहिजे.आजची तरुणाई ही मोबाईलसारख्या व्हाट्सअप,रील्स आभासी जगात जास्तीची रमत चालली आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे,असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.रामशेट्टी शेटकार यांनी केले तर आभार प्रा.मेघा पंडित यांनी मानले.गीता औटी या विद्यार्थिनींनेही वाचनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले.यावेळी डॉ.रोहिणी शिंदे,डॉ.राहुल मोरे,कॅप्टन डॉ.विजेंद्र चौधरी,डॉ.विश्वनाथ मोटे,डॉ.शंकर बिराजदार,डॉ.तब्बसुम मुजावार, डॉ.श्वेता लोखंडे,प्रा.सुजाता काळे,प्रा.आशा बोराडे,प्रा.अरुणा चौधरी,डॉ.लहू काथवटे,शंकर भालके यांच्यासह इतर प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचनात उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0