दुभाजकाला कचराकुंडी समजू नये.
दुभाजकाला कचराकुंडी समजू नये.
आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी २५ डिसेंबर, बुधवार रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये तीन तास श्रमदान करून औसा रस्त्यावरील नंदी स्टॉप पासून खर्डेकर स्टॉप पर्यंत दुभाजक स्वच्छ केलं.
दुभाजकात दुकानदारांनी टाकलेले पॅकिंगचे पदार्थ, भंगार साहित्य, केर कचरा, प्लास्टिक साहित्य असे एकत्रित चार ट्रॅक्टर कचरा बाहेर काढला.
दुभाजकाच्या परिसरात असलेल्या दुकानदारांकडे कचरा साठवण्याकरिता कचरापेटी नाही त्यामुळे हे लोक कचरा लगेच दुभाजकात आणून टाकतात किंवा दुकानासमोर जमा करून ठेवतात.
दुकानदारांनी कचरापेट्या आणाव्यात.
दुकानदारांनी कचरापेटी आणून घ्याव्यात आणि घंटागाडी येईपर्यंत कचरा कचरा पेटी मध्ये साठवून ठेवावा असे आवाहन आमचे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन च्या माध्यमातून दुकानदारांच्या भेटी घेऊन त्यांना करण्यात आलं.
घंटागाडीची वेळ बदलावी.
कित्येक वेळा घंटागाडी ही दुकान उघडण्याच्या अगोदर येऊन जाते, दुकान उघडल्यानंतर घंटागाडी यावी अशी मागणी ही कित्येक दुकानदारांनी केली.
दुभाजकात कचरा जमा होण्याचा आणखीन एक कारण लक्षात आलं ते म्हणजे प्रशासनाचे सफाई कर्मचारी रस्ता झाडल्यानंतर जी माती किंवा कचरा एकत्रित होते ते उचलून दुभाजकांमध्ये टाकतात त्यामुळे दुभाजक मातीने आणि कचऱ्याने भरून वाहत असतं.
औसा रस्ता परिसरातील खाद्य विक्रेते हातगाडे वाले शिल्लक अन्नधान्य, पालेभाज्या रात्री उशिरा दुभाजकात आणून टाकतात.
यामुळे आपलं शहर अस्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे दिसून येत आहे.
शहरातील प्रत्येक दुभाजकांमध्ये प्रचंड प्रमाणात कचरा जमा झालेला आहे तो कचरा वेळच्या वेळी काढून घ्यावा, दुभाजक स्वच्छ करावे असे आवाहन आमच ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन च्या वतीने डॉ. पवन लड्डा यांनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0