शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे रस्ता रोको आंदोलन
शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे रस्ता रोको आंदोलन
उदगीर: बाजारात सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केल्यामुळे केंद्र सरकारने नाफडे मार्फत सोयाबीन खरेदी चालू केली.त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करु नये, खरेदीला मुदतवाढ द्यावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी लातूर मार्फत देण्यात आला होता.त्या अनुषंगाने सरकारने फक्त विस हजार मेट्रिक टन खरेदीचे उद्दिष्ट वाढविले आहे.त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होऊ शकत नाही.त्याकरीता उद्दिष्ट व मुदत दोन्ही वाढवून नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय केंद्र बंद करु नये यासाठी आज स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने तिवटग्याळ पाटी ता.उदगीर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वर्षी केंद्र सरकारच्या डीओसी व पामतेल आयातीमुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षाही कमी झाले आहेत.ज्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघत नाही.त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
सरकारने सोयाबीनची नाफडे मार्फत हमी भावाने खरेदी केंद्रामार्फत खरेदी चालू केली आहे.त्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे.परंतू अद्यापही नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी शिल्लक आहे.अशा परिस्थितीत खरेदी बंद झाली तर शेतकऱ्यांना बाजार समितीतच चालू भावात सोयाबीन विक्री केल्याशिवाय पर्याय नाही.त्यामुळे ८०० ते १०००/- रुपये प्रति क्विंटल नुकसान होणार आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१३-१३ साली विरोधीपक्ष नेते असताना, त्यांनी पाशा पटेल यांच्या शेतकरी दिंडीत येऊन सोयाबीनला ६०००/- रु प्रति क्विंटल भाव मागीतला होता.आता ते स्वतः भाव देणारे आहेत.तरीही शेतकऱ्यांना सहा हजार भाव मिळत नाही.शेजारील मध्यप्रदेश राज्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा एक हजार रुपये वाढवून दिले आहेत.महाराष्ट्रात वाढवून तर नाहीच,पण जाहीर केलेला हमीभावही मिळण्याची शक्यता नाही.ज्या अर्थी सरकार शेतीमालाचे भाव कृषी मूल्य आयोगामार्फत ठरविते व हमीभाव जाहीर करते.त्या अर्थी जाहिर केलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळवून देणे,ही सरकारची जबाबदारी आहे.म्हणून नाफेडच्या खरेदीला जी ३१ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे. त्या मुदतीत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी असलेली गर्दी पाहता व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता, मुदतीत पूर्ण माल खरेदी होणे शक्य नाही.कारण त्या ठिकाणी बारदाना नाही, वजन काटा नाही, अशी कारणं सांगून खरेदी बंद ठेवली जात आहे.तर काही ठिकाणी अधीकची हमाली व कडता घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
त्यामुळे आज स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना यांच्या वतीने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी व खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट बंद करावी. यासाठी आज सकाळी ११ वाजल्यापासुन एक तास तिवटग्याळ पाटी, उदगीर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी दोन्ही बाजूला लांबवर वाहने थांबली होती.यावेळी तहसील प्रशासनाने निवेदन स्विकारुन शासनाकडे मुदतवाढ करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याणाप्पा हुरदळे, शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष कालिदास भंडे, उदगीर तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, शिवाजी भोळे,युवा तालुकाध्यक्ष नितेश झांबरे,शिवाजी पाटील,आदिंसह शेकडो शेतकरी व महिला उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0