श्रद्धा, सबुरीने साईबाबा बँक उच्च शिखर गाठेल
श्रद्धा, सबुरीने साईबाबा बँक उच्च शिखर गाठेल
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे प्रतिपादन; बँकेच्या सभासदांचा स्नेहमेळावा
लातूर : प्रतिनिधी
श्रद्धा आणि सबुरी ही श्री साईबाबा यांची शिकवण आहे़ या शिकवणीला अनुसरुन
वाटचाल करीत साईबाबा जनता सहकारी बँक बँकिंग क्षेत्रात उच्च शिखर गाठेल,
असा विश्वास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला़
बँकींग क्षेत्रात २७ वर्षांपासून कार्यरत असणारी आणि आर्थिक संस्था ही
नव्या उमेदीने सर्व अद्यावत सोयींसह सभासदांच्या सेवेत कार्यरत झालेल्या
साईबाबा जनता सहकारी बँकेच्या सभासदांच्या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन दि़ २
जानेवारी रोजी सकाळी ११़३० वाजता माजी मंत्री आमदाा अमित देशमुख यांच्या
हस्ते झाले़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ येथील मार्केट यार्डातील स्व़
दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या या मेळ्याव्याच्या
अध्यक्षस्थानी खासदार डॉ़ शिवाजी काळगे होते़ यावेळी प्रमुख पाहूणे
म्हणून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय साळूंके, काँग्रेसचे प्रदेश
सरचिटणीस मोईज शेख, विलास सहकारी बँकेचे चेअरमन अॅड़ किरण जाधव, जिल्हा
बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे,
विलास सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, शिंदे-चव्हण अॅण्ड गांधी
कंपनीचे सीए प्रवीण प्रजापती, काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ़
अरविंद भतांब्रे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, सचीन वाणी,
डॉ़ एऩ जी़ मिर्झा, साईबाबा जनता सहकारी बँकेचे चेअरमन जे़ जी़ सगरे,
व्हाईस चेअरमन सोनू डगवाले, संचालक एस. बी़ जटाळ, सत्तारखा पठाण,
विष्णुदास धायगुडे, इसरार सगरे, ओमप्रकाश गलबले, श्रीशैल कोरे, वाय. एस.
मशायक, अकबर सगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम़ आऱ पाटील उपस्थित होते़
जे़ जी़ सगरे, इसरार सगरे व त्यांच्या सहकार्यांनी बुडत असलेली साईबाबा
जनता सहकारी बँक पुनर्जिवीत केली, त्याबद्दल त्यांचे कौतूक करुन माजी
मंत्री आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले, लातूर हे विकासरत्न विलासराव
देशमुख यांच्यासाठी जीव की, प्राण होते़ लातूर आहे तर आपण आहोत, ही
त्यांची भावना होती़ त्यानूसार आपण सर्वचजण लातूरच्या जढण घडणीसाठी
कार्यरत आहोत़ आपल्या शेजारील बीडची परिस्थिती आपण पाहात आहोत़ बीड
जिल्ह्यातील अंबाजोगाईचे नागरिक म्हणतात आम्हाला सुखाने जगण्यासाठी आमचा
लातूर जिल्ह्यात समावेश करा़ खरे तर ही तमाम लातूरकरांनी लातूरला
जपल्याची पावती आहे़ हे सर्व विकासरत्न विलासराव देशमुख यांनी उभे केले़
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या
नेतृत्वात नावारुपाला आली़ शुन्य टक्के व्याज दराने ५ लाख रुपये देणारी
लातूर जिल्हा बँक जगातील पहिली बँक आहे़ विकासरत्न विलासराव देशमुख
यांच्या विचारांचा वारसा तमाम लातूरकरांमध्ये असल्यामुळेच लातूरात शांती,
कायदा, सुव्यवस्था अबाधित आहे़
लातूर मल्टिस्टेटचे चेअरमन तथा साईबाबा जनता सहकारी बँकेचे संचालक इसरार
सगरे यांचे सहकारातील काम तसेच संघटन कौशल्य उत्तम असल्याचे नमुद करुन
माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, बँक पारदर्शक चालली पाहिजे़
गुणवत्तेवर व्यवसाय केला तर व्यवसाय टिकतो़ गुणवत्ता आणि लातूरकर यांचे
एक वेगळे नाते आहे़ त्यामुळे गुणवत्ता टिकुण आहे़ लातूरात कायदा व
सुव्यवस्था आपण उत्तम राखली आहे आता सरकारी अधिकारी कर्मचाºयांकडून लातूर
शहरातील नागरिकांची पीळ वणूक मोठ्या प्रमाणावर होत आहे लोकनेते विलासराव
देशमुख यांच्या काळात असे कधीच नव्हते सध्या बीड जिल्हा अडचणीत आहे
त्याला अडचणीतून बाहेर राज्य सरकारने काढावे, असे ते म्हणाले़
अध्यक्षीय समारोप करताना खासदार डॉ़ शिवाजी काळगे यांनी लहान-लहान
सेक्टरला बँकेशी जोडले तर बँक प्रगती करेल, असे नमुद करुन बँकेच्या
वाटचालीस शुभेच्छा दिल्या़ यावेळी अशोक गोविंदपुरकर, अभय साळूंके, सचिन
वाणी यांनीही शुभेच्छा दिल्या़ प्रास्ताविक इसरार सगरे यांनी केले़
साईबाबा जनता सहकारी बँकेची स्थापना १९९७ मध्ये झाली़ लातूर, औसा,
निलंगा व चाकुर अशा चार ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत़ २८ हजार सभासद
असल्याची माहिती त्यांनी दिली़ प्रारंभी साईबाबा व विकासरत्न विलाससराव
देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन दीपप्रज्वलनाने
स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते
झाले़ पाहूण्यांचे स्वागत जे़ जी़ सगरे, इसरार सगरे, सोनू डगवाले, एस़
बी़ जटाळ, सत्तारखा पठाण, एम़ आऱ पाटील, ओमप्रकाश गलबले, विष्णुदास
धायगुडे, वाय़ एस़ मशायक, अकबर सगरे, विष्णुदास कासले यांनी केले़
कार्यक्रमास अॅड़ फारुक शेख, व्यंकटेश पुरी, सुभाष घोडके, प्राचार्य
एकनाथ पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते़
चौकट
विलासराव साहेबांनी पाठीवर दिलेली थाप प्रेरणादायी
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असा कुठलाही वारसा नसलेल्या कुटूंबाला खरी साथ
मिळाली ती विकासरत्न विलासराव देशमुख यांची़ मी एक साधा शिक्षक साहेबांनी
मला बोलावल आणि चांगलं करा, मी तुमच्या सोबत आहे, असे नमुद करुन माझ्या
पाठीवर थाप दिली़ ती थाप माझ्यासाठी एवढी प्रेरणादायी ठरली की, आज
शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात चांगले तेच करता आले़ आज माजी मंत्री
दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख
यांच्याकडूनही मोठे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगुन त्यांनी
साईबाबा जनता सहकारी बँक पुनरुर्जिवीत करताना खडतर प्रवास कथन केला़
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0