विनोद चव्हाण यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
विनोद चव्हाण यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
लातूर
येथील राजा नारायणलाल लाहोटी सीबीएसई इंग्लिश स्कूलचे शिक्षक विनोद चव्हाण यांना मराठवाडा समन्वय समिती पुणे, यांच्यातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा 'मराठवाडा भूषण' 'आदर्श शिक्षक पुरस्कार - २०२४ जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण बुधवार (जानेवारी १, २०२५ ) रोजी तुळजापूर येथे आयोजीत भव्य कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मराठवाडा समन्वय समिती पुणे, ही एक मराठवाड्याच्या सर्वागिण विकासासाठी कार्य करणारी समाजिक सेवाभावी संस्था आहे. ही संस्था मागील अनेक वर्षापासून पुणे व मराठवाडा येथे विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. दिवंगत भानुदासराव धुरगुडे हे मराठवाड्यातील अग्रणी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी म्हणून परिचित होते. हैदराबाद संस्थान व इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अमूल्य योगदानासाठी शासनाने त्यांना ताम्रपदक व सन्मानपत्र प्रदान करून गौरव केला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भानुदासराव यांनी समाजसुधारणा व शिक्षण प्रसारासाठी आयुष्यभर कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या १ जानेवारी रोजीच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मागील अनेक वर्षापासून दरवर्षी मराठवाड्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांना 'मराठवाडा भूषण' आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२४ या वर्षासाठी राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे शिक्षक विनोद चव्हाण यांची 'मराठवाडा भूषण' आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, पंचायत समिती प्रांगण, तुळजापूर येथे आयोजीत भव्य समारंभात वितरीत होणार आहे. विनोद चव्हाण यांनी शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपले अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मराठवाडा समन्वय समिती पुणे, यांच्यातर्फे 'मराठवाडा भूषण' 'आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड आशिष बाजपाई, चेअरमन आनंद लाहोटी, प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलु, रजिस्ट्रार प्रविण शिवणगीकर, डॉ. पांडुरंग शितोळे, डॉ. राजाराम जाधव, माझं घर प्रकल्प प्रमुख शरद झरे, प्रा. सुभाष भिंगे, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा सुधीर साळुंखे, डॉ गणेश पन्हाळे, कपिल शेवाळे आदींनी विनोद चव्हाण यांचे अभिनंदन केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0