दयानंद शिक्षण संस्थेच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार
दयानंद शिक्षण संस्थेच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार
लातूर: "न्यायव्यवस्थेकडून नागरिकांच्या अपेक्षा योग्य आहेत, परंतु अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीवही तेवढीच महत्त्वाची आहे," असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी व्यक्त केले.
दयानंद शिक्षण संस्था, विधी महाविद्यालय, जिल्हा वकील मंडळ आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता आणि जबाबदारीवर भर दिला.
न्या. वराळे म्हणाले, "साक्ष आणि पुरावे योग्य प्रकारे न्यायालयापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. न्यायव्यवस्थेतील प्रक्रियांना सहकार्य करण्याची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारली पाहिजे. आपले अधिकार आणि हक्क जसे महत्त्वाचे आहेत, तसेच समाजातील स्वच्छता, जबाबदारी आणि नैतिकता जोपासण्यासह इतर कर्तव्येही तेवढीच महत्त्वाची आहेत."
विधिज्ञांसाठी वाचन व अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रंथांचा प्रचंड संग्रह केला आणि सतत अध्ययन केले. अवांतर वाचनाने माणसाची विचारशक्ती विकसित होते, आणि समाजातील प्रश्नांची जाणीव होते." असे सांगत असताना वाचनाशिवाय पर्याय नाही याची त्यांनी जाणीव करून दिली.
स्वतःच्या शिक्षणप्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले, "माझ्या आजोबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करण्याची संधी मिळाली, तर वडील न्या. भालचंद्र वराळे यांचा व्यासंग मोठा होता. त्यामुळे अभ्यास, वाचन आणि चिंतनाची परंपरा माझ्या जडणघडणीत महत्त्वाची ठरली. यावेळी त्यांनी सार्वजनिक वाचनालयातील वाचनाचा आवर्जून उल्लेख केला.
सर्व काही करत असताना मानसिक व शारीरिक स्वास्थ जपण्याचे आणि वेळप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दयानंद शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले, "मर्यादित संसाधनांच्या काळातही या संस्थेने विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. येथे वक्तृत्व, वाचन, लिखाण आणि एकांकिका स्पर्धांमधून व्यक्तिमत्व घडवण्याची संधी मिळाली. लातूरच्या ज्ञानपरंपरेचा हा एक मोठा ठेवा आहे."
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लक्ष्मी रमण लाहोटी यांनी न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांचा सत्कार ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे तसेच विद्यार्थी हितासाठी संस्था सदैव तत्पर आहे असे सांगितले.
ॲड. आशिष बाजपेयी यांनी न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे हे व्यस्त दिनीचर्येतून वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. पूनम नाथानी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली याबद्दल माहिती दिली. तसेच न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांची भेट ही विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला सौ. गीता वराळे, अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, ॲड .आशिष बाजपाई, प्र.प्राचार्य पूनम नाथानी, ॲड . नरेश कुलकर्णी, ॲड . तेजस्वि जाधव, दयानंद शिक्षण संस्थेचे नियामक मंडळ, ॲड. बळवंत जाधव, ॲड. संजय पांडे, आजी माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, नागरिक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शुभांगी पांचाळ आणि प्रा.वीणा इंगळे यांनी केले, तर आभार प्रा. एन. डी. जाधव यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0