आज ११८ व्या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये रत्नागिरी येथील विदुषी मुग्धा भट - सामंत यांचे गायन*
आज ११८ व्या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये रत्नागिरी येथील विदुषी मुग्धा भट - सामंत यांचे गायन*
आज ११८ व्या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये रत्नागिरी येथील विदुषी मुग्धा भट - सामंत यांचे गायन* येथील आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ११८ व्या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये रत्नागिरी येथील प्रसिद्ध गायिका विदुषी मुग्धा भट- सामंत यांचे गायन होणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी मागील ११७ महिन्यांपासून लातूरमध्ये आवर्तन मासिक संगीत सभेचे आयोजन केले जाते, या मासिक संगीत सभेमध्ये आजपर्यंत भारतातील अनेक दिग्गज कलावंतांनी आपले गायन वादन तसेच नृत्य सादर केले आहे. आज बुधवार दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी होणारी आवर्तन मासिक संगीत सभा लातूर येथील कै.सौ. कुमोदिनी विजयराव कुलकर्णी व कै. विजय दत्तात्रयराव कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ लातूर येथील प्रसिद्ध फर्निचर वर्ल्ड चे प्रोप्रायटर श्री मनोज कुलकर्णी व त्यांच्या परिवाराने आयोजित केली आहे, आज होणाऱ्या या ११८ व्या मासिक संगीत सभेमध्ये रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध गायिका विदुषी मुग्ध भट - सामंत यांचे गायन संपन्न होणार आहे. व यांना तबला साथ लातूर येथील सुप्रसिद्ध तबला वादक श्री. संजय सुवर्णकार व संवादिनी साथ प्रा.शशिकांत देशमुख हे करणार आहेत. ही संगीत सभा आज सायं ६:३० वाजता, गणेश हॉल अष्टविनायक मंदिर लातूर या ठिकाणी होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा सचिव डॉक्टर रविराज पोरे, विशाल जाधव व फर्निचर वर्ल्ड चे मनोज कुलकर्णी व समस्त कुलकर्णी परिवाराच्या व आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे. वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0