एमआयटीच्या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डॉ. प्रणिता चाकूरकर यांचे प्रतिपादन
एमआयटीच्या कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डॉ. प्रणिता चाकूरकर यांचे प्रतिपादन
लातूर दि.११ - सध्याची बिघडलेली जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवई आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज प्रत्येकाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. योगासने प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. तेव्हा महिलांनी मानसिक व शारीरिक स्वास्थ राखण्यासाठी स्वतः करिता किमान अर्धा तास वेळ काढून योगा करावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्येष्ठ शिक्षिका डॉ. प्रणिता चाकूरकर यांनी केले.
लातूर येथील एमआयटी मेडिकल कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे मनस्वास्थ याबाबत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रणिता चाकूरकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. एन. पी. जमादार हे होते. तर महिला उन्नतीकरण समितीच्या डॉ. सरिता मंत्री, जेष्ठ प्रा. चंद्रकला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दैनंदिन कामाची दगदग आणि ताणतणाव यातून योगाच बिघडलेल्या जीवनशैलीतून मार्ग काढू शकतो असा मौलिक सल्ला देऊन डॉक्टर प्रणिता चाकूरकर म्हणाल्या की, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. योगा हा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. योगा पुरुष आणि महिला दोघांसाठीही तितकाच महत्त्वाचा असला तरी, महिलांसाठी त्याचे विशेष फायदे आहेत. शारीरिक ताकद वाढवण्या व्यतिरिक्त, योगा महिलांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देण्यास मदत करू शकतो.
महिलांच्या जीवनात उद्भवणारी आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करून डॉ. चाकूरकर यांनी टेलिव्हिजन मोबाईलचा वापर कमी करून योगासाठी वेळ द्यावा असा मौलिक सल्ला दिला. महिलांच्या विकासाकरिता कृती गतिमान करणे आवश्यक असल्याचे डॉ. सरिता मंत्री यांनी बोलून दाखवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पावले यांनी केले तर शेवटी डॉ. शैला बांगड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. एकनाथ माले, डॉ. क्रांती केंद्रे, डॉ. विद्या कांदे, डॉ. शितल शेळके, डॉ. आशा पिचारे, डॉ. शीला कुलकर्णी, डॉ. स्मिता बोलसुरकर, डॉ. संजीवनी मुंडे, डॉ. स्मिता चाठे, डॉ. रोशनी आकुसकर, डॉ. माही दरकशा यांच्यासह महिला डॉक्टर महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0