जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना जनहित युवा संघटनेचे निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना जनहित युवा संघटनेचे निवेदन
लातूर प्रतिनिधी,
अनुसुचित जाती नवबौद्ध घटकातील कच्चे घर असणाऱ्या नागरिकांचे पक्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे या उदार्थ हेतूने केंद्र शासन/महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाकडून माता रमाई आंबेडकर आवास योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 2012 पासुन सदरील योजना कार्यान्वित करण्यात आली या योजनेतून लातूर शहरात अंदाजे 3500 लाभार्थ्यांना पक्या घराचा लाभ मिळाला आहे.प्रलंबित अर्ज मंजूरी करीता लातूर शहर महानगर पालिकेकडून 100 टक्के कर भरणा भरूनच अर्ज मंजूर केलेले आहेत.या मंजूर अर्ज लाभार्थीना अचार संहिता व विविध कारणाने घरकुल बांधकामाचे हप्ते प्रलंबित ठेवण्यात आले आहेत तेव्हा सदरीत थकित हप्ते तातडीने देण्यात यावे अशी मागणी जनहित सेवा युवा संघटनेच्या वतीने आज दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
वर्तमान काळात सदरील योजनेतील प्रलंबीत हप्ते मिळावेत जेणे करून अर्धवट राहिलेले बांधकाम पुर्ण करण्या हेतून लाभार्थी लातूर शहर महानगर पालिकेत खेटे मारीत आहेत संबंधीत अधिकाऱ्या कडून चालू वर्षाचा कर भरणा व पुर्वी जल जीवन प्राधिकरण यांच्या कडे थकित मनमानी नागरीकांना आलेली पाणी पट्टी पुर्ण भरणा करण्याची जाचक अट लादली जात आहे.सदरील योजना स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत राबवली जात असतना कर भरणा सक्तीचा नसताना सुद्धा संबंधित आधिकाऱ्याकडून लाभार्थांना कर भरण्याची सक्ती/जाचक अट लादली जात आहे. माता रमाई घरकुल योजनेतील थकीत हप्त्यासाठी मनपा आयुक्तांनी लावलेली सक्ती कर भरणा जाचक अट रद्द करावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनहित युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी दिले निवेदन.
या निवेदनावर दिलेल्या अर्जानुसार तात्काळ कार्यवाही नाही झाल्यास येणाऱ्या पुढील काळात लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0