दिव्यांगांना-सहानुभूतीपेक्षा-अनुभूतीची-आवश्यकता
दिव्यांगांना-सहानुभूतीपेक्षा-अनुभूतीची-आवश्यकता
लातूर दि. ०५ जाने.
आज समाजातील दिव्यांगाना सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी सहानुभूतिपेक्षा अनुभूतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, उपकेंद्र लातूर आणि समाजकार्य विभाग, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २१ प्रकारच्या दिव्यांगासंबंधी चित्रप्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते यावेळी ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
यावेळी विचारमंचावर व्यवस्थापक जिल्हा दिव्यांग पुनर्सन केंद्र, लातूरचे विशेष शिक्षक बसवराज पैके, आकाश जोशी, वैष्णवी तावरे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. नयन राजमाने, प्रा. आशिष स्वामी आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. संजय गवई म्हणाले की, आज आपण सर्वांनी दिव्यांग बंधू-भगिनींना सहकार्य केले पाहिजे, त्यांच्या गरजा, समस्या, भावना समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. आज दिव्यांग हे विविध क्षेत्रांमध्ये आपल्या दिव्यांगावर मात करून उच्च विद्या विभूषित झाले आहेत. तसेच शासकीय आणि खाजगी व्यवसाय सुद्धा करीत आहे, यासाठी त्याचे आपण अभिनंदन केले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी बसवराज पैके म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड उपकेंद्र, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांनी या कार्यक्रमाला महाविद्यालयात परवानगी दिली त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. आशिष स्वामी यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनाचा महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, बीसीए व समाजकार्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य विभागप्रमुख डॉ. दिनेश मौने, प्रा. काशीनाथ पवार, डॉ. दत्ता करंडे, नंदू काजापुरे, बालाजी डावकरे, कृष्णा कोळी, प्रांजली शेळके, नेहा मढूळे, शुभांगी राठोड, अजय गुंटे, आदित्य शिरसाठ व राजनंदनी गायकवाड यांनी सहकार्य केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0