वैज्ञानिकांचे संशोधन : विज्ञानाची प्रेरणादायी उंची - डॉ.युवराज सारणीकर
वैज्ञानिकांचे संशोधन : विज्ञानाची प्रेरणादायी उंची - डॉ.युवराज सारणीकर
लातूर : वैज्ञानिकाची जयंती या उपक्रमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून त्यांनी विज्ञान क्षेत्रात काम करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे.कारण वैज्ञानिकांचे संशोधन हे विज्ञानाची प्रेरणादायी उंची निर्माण करणारे आहे,आपणही नावीन्यपूर्ण संशोधन करून नावलौकिक करावे असे प्रतिपादन रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर यांनी केले.
दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी ब्रूस नेथन अॅमस यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.युवराज सारणीकर यांनी अॅमस यांच्या प्रतिमेस वंदन करून केली.डॉ.कोमल गोमारे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.कार्यक्रमात बी.एस्सी.बी.टी.द्वितीय वर्षाची विद्यार्थ्यांनी पर्णवी ढवारे यांनी ब्रूस नेथन अॅमस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.अॅमस हे एक प्रसिद्ध अमेरिकन बायोकेमिस्ट होते आणि त्यांनी म्युटाजेनेसिस व डीएनए रिपेअरसंबंधी महत्त्वपूर्ण कार्य केले.त्यांनी अॅमस टेस्टचा शोध लावला,जी एक सोपी आणि किफायतशीर पद्धत आहे,ज्याद्वारे कोणत्याही कंपाऊंडची म्युटाजेनेसिटी तपासता येते.यामुळे टॉक्सिकोलॉजीमध्ये मोठे बदल घडले आणि पर्यावरणीय कॅन्सरकारक पदार्थ शोधण्यास मदत झाली.अॅमस यांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी बर्कले, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.
जयंतीनिमित्त डॉ.युवराज सारणीकर यांनी शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कार्याचे उदाहरण दिले.महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात जैवतातंत्रज्ञान विभागातील डॉ.फिरदौस,प्रा.अवंती बिडकर, डॉ.नितीन चौहान,प्रा.स्वरूप गावकरे,प्रा.अनुराधा शिंदे पाटील,शिक्षकेत्तर कर्मचारी अश्विनी ढवारे आणि दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0