राज्यस्तरिय रग्बी स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरिय रग्बी स्पर्धेसाठी निवड
तळेगाव दि. 27 रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्येमाने रग्बी स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा कार्यालय कळंब येथे करण्यात आले होते. यामध्ये क्राईस्ट इंटरनॅशनल स्कुल, अहमदपुरचा 17 वर्षे वयोगटातून मुलांचा संघ प्रथम आला आहे. या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामधील श्रीहरी नागीमे, अरमान पठाण, ज्ञानेश्वर जाधव, परवेज शेख, सन्नी तिवाणा, मानव बदणे, चैतण्य रेड्डी, ओमकार किरडे, हेरिक नाडार, श्रेयेश बच्चेवार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत विभागात प्रथम क्रमांक मिळवला आह. खेळाडूंना क्रीडा शिक्षक ईस्माईल शेख, राहुल आडसुळ, विक्रम गायकवाड, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते. या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे यांनी अभिनंदन केले. तसेच संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, ट्रस्टी सोनीप्रिया मद्देवाड, सीईओ रितु मद्देवाड, प्रशासक रक्षा मद्देवाड यांनी पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गातूनही यशाबद्दल खेळाडूंचे कौतुक केले जात आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0