-प्रतापराव पाटील चिखलीकर
-प्रतापराव पाटील चिखलीकर
लोहा,(प्रतिनिधी)
विधानसभेच्या निवडणूकीत जातीवाद झाला हे अतिशय धोकादायक असून राजकारण ज्यांनी जातीवर केले ते पुढे यशस्वी झाले नाहीत पण कधी नव्हे इतका त्रास कार्यकर्त्याना सुद्धा झाला. विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा घेणे नाही तुम्ही।संयम ठेवा सर्व जाती धर्माच्या मतदारांनी तसेच बाहेरील मित्रपरिवारानी माझ्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले हा एकजुटीचा सर्व जाती धर्मच्या लोकांचा विजय असून जातीवाद करणाऱ्यानी या मतदारसंघाने नाकारले मी आपला सदैव ऋणी आहे अशी कृतज्ञता नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दि.(२८) रोजी व्यंकटेश गार्डन मंगल कार्यालयात आयोजित मतदार व कार्यकर्त्यांच्या जाहिर आभार सोहळ्यात केले.
प्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्याध्यक्ष दिलीप धर्माधिकारी ,माजी नगराध्यक्षा कल्याणराव सूर्यवंशी,संध्याताई राठोड,माणिकराव मुकदम, किरण वट्टमवार, प्राणिताताई देवरे चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, आनंदराव पाटील, हंसराज पाटील बोरगावकर, मनोहर पाटील , केशवराव मुकदम ,छत्रपती धुतमल , नाना तिडके, करीम शेख, हरिभाऊ चव्हाण,सचिन पाटील चिखलीकर, शोभाताई बगडे, जफारोद्दीन बहोद्दीन, हरिभाऊ चव्हाण, दता वाले, नरेंद्र गायकवाड, भगवान हाके,दीपक पाटील, अविनाश सूर्यवंशी,सचिन मुकदम, सुर्यकांत गायकवाड,यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले जातीवाद मोठ्या प्रमाणात झाला सर्व उमेदवारानी माझ्यावर वाट्टेल ते बोलले ज्याची लायकी नव्हती तेही बोलले पण मी संयम ठेवला शांत होतो.आता येणाऱ्या काळात निवडणूकीत ज्यांनी मला मदत केली माझ्या साठी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्याना मी दूर करणार नाही.केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे.प्रामाणिक कार्यकर्ता माझ्यासाठी गावात प्रयत्नशील राहिला.जातीवाद प्रचंड झाला,एका जातींवर निवडणूक होत नाही.ज्यांनी ज्यांनी सोबत राहून दगा दिला त्याची माझ्याकडे नोंद आहे.माझ्या सारख्या कार्यकर्त्याना तुम्ही नेहमीच साथ दिली आडचणीच्या काळात एकजुटीने राहिलात आणि माझा हा विजय सर्व जातीधर्माच्या लोकांचा, मतदारांचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सदरील कार्यक्रमाचे सुचलन बी डी जाधव, तर आभार भास्कर पाटील यांनी मानले.
कंधार मार्गे लोहा शहरात आगमन झाल्या नंतर नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्यावर सहा जेसीबी मधून फुलांची उधळण करत अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर ,पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0