राज्यस्तरीय आपत्ती, व्यवस्थापन शिबीरात दयानंद कला महाविद्यालयाच्या स्वंयसेवकांचा सहभाग
राज्यस्तरीय आपत्ती, व्यवस्थापन शिबीरात दयानंद कला महाविद्यालयाच्या स्वंयसेवकांचा सहभाग
लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय, लातूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग “आव्हान 2024” संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती Chancellors Brigad महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन पुर्व तयारी प्रशिक्षण शिबीर दि.7 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 रोजी अमरावती या ठिकाणी संपन्न झाले.
या मध्ये दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) या विभागाचे स्वंयसेवक पवार निखिल, गोरे सुरज व स्वंयसेवीका निकीता कापसे, आरती वाघमारे यांचा सहभाग होता. सदरील शिबीरामध्ये नैसर्गिक आपत्ती तसेच सर्पदंश प्रथोमउपचार, अग्णिशामक व्यवस्था व आपत्ती आल्यानंतर करावयाचा तत्कालीन समायोजन या सर्वाचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण देण्यात आले. हे आपत्ती व्यवस्थापन शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल स्वयंसेविका व स्वयंसेवकांचे कौतुक करताना दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे व पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित वरिष्ठ महाविद्यालयातील विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम हे उपस्थित होते
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0