सप्तरंगी साहित्य मंडळाची व्यक्तीविशेष काव्यपौर्णिमा; अनेक कवी कवयित्रींचा कार्यक्रमास लाभला उत्तम प्रतिसाद
सप्तरंगी साहित्य मंडळाची व्यक्तीविशेष काव्यपौर्णिमा; अनेक कवी कवयित्रींचा कार्यक्रमास लाभला उत्तम प्रतिसाद
नांदेड - येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मार्गशीर्ष पौर्णिमेचे औचित्य साधून कै. शरदचंद्र हयातनगरकर व्यक्तीविशेष काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'मिटविला जगण्यातला अंधार बापाने, टाकले घरदार उजळून बापाने... वेदनांशी इतका जिव्हाळा की, पोसले लोणार बापाने...' ही गझल सुप्रसिद्ध गझलकार चंद्रकांत कदम यांनी गायन करीत सादर केली तेंव्हा उपस्थित सारेच गहिवरले. मंडळाच्या वतीने शहरातील तरोडा बु. परिसरातील सिद्धार्थ नगरच्या अशोक प्राथमिक शाळेत सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ९० व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध गझलकार चंद्रकांत कदम, कवी प्रल्हाद घोरबांड, विचारवंत बालाजी थोटवे, काव्य पौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी पांडुरंग कोकुलवार यांची उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा पौर्णिमेचे औचित्य साधून काव्यपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त ९० व्या काव्यपौर्णिमा श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात राहुल जोंधळे, प्रशांत गवळे, सुभाष शिंगणकर, मारोती काळबांडे, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, विलास नरवाडे, प्रल्हाद घोरबांड, मारोती कदम, चंद्रकांत कदम, सुमनबाई गच्चे, रुपाली वागरे, सारिका कंधारे, उषाताई ठाकूर, संजय पाटील, थोरात बंधू, मारुती धनगर, साईनाथ रहाटकर, अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, पांडुरंग कोकुलवार, प्रल्हाद घोरबांड, रंगनाथ नवघडे यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार थोरात बंधू यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतबाई थोरात, माया थोरात, समृद्धी डोंगरे, वंदना डोंगरे, तेजस डोंगरे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रति,
मा. संपादक/ जिल्हा / शहर प्रतिनिधी साहेब
दै...........
सदरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करुन सहकार्य करावे ही विनंती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0