दयानंद कलात बारावी निवडक विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !
दयानंद कलात बारावी निवडक विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !
लातूर: दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या निवडक विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारभ डायटच्या प्राचार्या डॉ.भागीरथी गिरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी असे मनोगत व्यक्त केले की, विद्यार्थ्यांची बारावी बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाची जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे. तुम्ही स्वप्न मोठे पहा त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि वास्तवात उतरवून अधिकारी व्हा . विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा याकरिता दयानंद शिक्षण संस्था सतत कार्यरत असते. मुलांच्या भौतिक क्षमता प्रत्येक पिढीगणिक वाढलेली पाहायला मिळते आहे. त्याची कास धरून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून आपली वेगळी वाट निर्माण करावी.
बारावीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास फार मेहनतीचा आहे आणि त्यात टिकण्याकरिता वेगवेगळ्या शाखेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर सकारात्मकपणे केल्यास आपल्या मधूनच वारे गुरुजी व डी.गुकेश निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी परीक्षा पूरते वाचन न करता त्या संबंधित संदर्भ ग्रंथाचे चिंतन-मनन करणे आवश्यक आहे आणि त्यामधूनच क्रिएटिव्ह माईंड चा विकास करता येतो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात असे प्रतिपादित केले की, बारावी बोर्ड परीक्षेतील यश हे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणारे असते. दयानंद कला महाविद्यालय विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवावे. दयानंद शिक्षण संस्थेची यशाची परंपरा तुम्ही कायम राखाल असा विश्वास व्यक्त केला.
व्यासपीठावर वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दीक्षित व परीक्षा विभाग प्रमुख डॉ.गोपाल बाहेती उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका पांचाळ व आभार कु. आशा राठोड हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जिगाजी बुद्रुके व प्रा.दशरथ ननवरे यांनी मेहनत घेतली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0