पुण्याच्या यशदातील तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन
पुण्याच्या यशदातील तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन
लातूर/प्रतिनिधी: मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुसूत्रता येऊन कामाची गती वाढावी यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेवरून एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. पुण्यातील यशदाच्या तज्ञ प्रशिक्षक व व्याख्यात्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मनपामध्ये नव्याने ८१ पदांची भरती करण्यात आलेली आहे.तसेच अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीने बढती देण्यात आली आहे.या सर्वांच्या कामात सुसूत्रता यावी, कौशल्य विकास व्हावा व कामकाजाची गती वाढावी यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी यशदाचे डॉ.बबन जोगदंड यांनी 'बदलते जग, बदलते प्रशासन' 'बदलांना तयार व्हा' या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच 'कार्यालयीन पद्धती व विभागीय चौकशी' यासंदर्भात माहिती दिली.'हसत खेळत तणाव मुक्ती' या संदर्भात व्याख्याते अशोक देशमुख यांनी संवाद साधला. नाशिकचे संदीप सावंत यांनी 'माहितीचा अधिकार' या संदर्भात मार्गदर्शन केले.'संगीतातून तणावमुक्ती' या विषयावर व्याख्याते संतोष बोराडे यांचे मार्गदर्शन झाले.
या प्रशिक्षणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामात सुधारणा होऊन कामकाजाला गती येणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.मनपा अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव,उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे व उपायुक्त कांचन तावडे यांनी प्रशिक्षक व व्याख्यात्यांचे स्वागत केले. भांडारपाल बालाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.या कार्यशाळेस मनपातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0