विलासराव देशमुख फाउंडेशनच्या पुढाकाराने कातपुर येथे शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या पुढाकाराने कातपुर येथे शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात
महीलांनी आर्थिक स्वावलंबी होवून
स्वताच्या पायावर उभे रहाणे गरजेचे
- सौ. अदिती अमित देशमुख
: शनिवार दि. २१ डिंसेबर २४:
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यातील मौजे कातपुर
येथे महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत,
फाउंडेशनच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात
आले आहे. या केद्राचा शुभारंभ ट्वेंटीवन ॲग्री लीच्या संचालिका सौ. अदिती
अमित देशमुख यांची उपस्थिती करण्यात आला.
ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या
उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात एकूण 96 महिलांनी
सहभाग घेतला आहे. या केंद्रामध्ये महिलांना शिलाईचे विविध प्रकार,
डिझाइनिंग आणि व्यवसायाची मूलभूत माहिती दिली जाणार आहे. या
प्रशिक्षणाच्या माध्यमात महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची संधी
मिळणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना सौ. अदिती अमित देशमुख यांनी, महिला सक्षमीकरणाचे
महत्त्व विशद केले. यासाठी महीलांनी आर्थिक स्वावलंबी होवून स्वताच्या
पायावर उभे रहाणे गरजेचे आहे असे सांगून त्यांनी या प्रशिक्षण
केंद्राच्या माध्यमात महिलांना आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळणार असल्याचे
सांगितले. विलासराव देशमुख फाउंडेशनच्या पुढाकाराने येणाऱ्या काळात
महीलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगीतले.
यावेळी संस्थेच्या समन्वयक संगीता मोळवणे, सरपंच रेणुकाताई तुकाराम आयतन
बोयणे, उपसरपंच विष्णू (मनोज) बालासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य
महादेव प्रभाकर मस्के, माजी ग्रामपंचायत सदस्य विमलबाई राजाराम गलांडे,
भाऊसाहेब बापुराव लोखंडे, ट्रेनर सेजल सुर्यवंशी, संस्थेचे सोशल प्लॅनर
गजानन बोयणे आणि गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0