ह.भ.प.श्रीरंग महाराज औसेकर
ह.भ.प.श्रीरंग महाराज औसेकर
चाकूर ता.प्रः-अन्न परब्रम्ह असुन ,अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असुन हे ओम साईप्रसाद अन्नछत्राचे पुण्यकर्म असल्याचे प्रतिपादन
ह.भ.प.श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले असुन ते चाकूर येथील कपिलानंद प्रतिष्ठान संचलित ओम साईप्रसाद अन्नछत्राच्या एक वर्षपुर्ती निमीत्ताने आयोजीत सत्यनारायण महापुजे निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणुन आशीर्वचनात बोलत होते.
यावेळी विविध विशाल कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा ओम साईप्रसाद अन्नछत्राचे संस्थापक डॉ.गोविंदराव माकणे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थित होते.
ह.भ.प. औसेकर महाराज पुढे म्हणाले की,तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील अन्नछत्रांपैकी एक नामवंत असलेले श्री कपिलानंद प्रतिष्ठानद्वारा संचलित ओम साईप्रसाद अन्नछत्रामधे दररोज सत्तर गरजवंत दिव्यागं,वृध्द,निराधार व्यक्तीना दोन वेळचे जेवण दिले जाते.त्यामुळे हे अन्नछत्र पुण्यछत्र बनले आहे.या अन्नछत्राची स्थापना एक वर्षांपूर्वी करण्यांत आली .तेंव्हापासुन आजतागायत अन्नछत्राची सेवा अंखडीतपणे चालू आहे.हा अन्नदानाचा हा यज्ञ सातत्याने चालू आहे. ओम साईप्रसाद अन्नछत्रालयामधे सर्व जाती-धर्मांच्या वयोवृद्ध,दिव्यांग,निराधार, व ज्यांना कोणीच नाही अशा ७० लाभार्थ्यांना या अन्नछत्रांमध्ये दोन वेळचे जेवण पुरविले जाते.यामुळे यांचे आशीर्वाद निश्चीतपणे मिळतात.
चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की,दिव्यागं,वृध्द,निराधार व्यक्तीना मोलमजूरीची कमे करता येत नाहीत.त्यामुळे त्यांच्या भोजन व औषधौपचाराची समस्या होती.जगावे कसे हा प्रश्न त्याच्यांसमोर होता.अशा लोकांना आधार देण्यांसाठी ओम साईप्रसाद अन्नछत्र सुरू करून त्यांचा जीवन जगण्यांचा मार्ग सुखकर केला. या वेळी संचालक जाकीरहूसेन कोतवाल,मन्मथ पाटील,अजय नाकाडे,मन्मथ पाटील, दिगांबर मोरे,व्यंकटराव धोंडगे, किशन रेड्डी,गोविंद भोरे,गुरूनाथ सांगवे ,पंडीत मोरे, धोंडीराम तोंडारे,प्रकाश तेलंग,बाळू लाटे,पपन कांबळे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालक शिरीष रेड्डी यांनी केले.तर उपस्थिंताचे आभार व्यवस्थापक कपिल आलमाजी यांनी मानले.
ओम साईप्रसाद अन्नछत्रालयाला आता एक वर्षा पेक्षा जास्त काळ पूर्ण होत आसल्यामुळे या सर्व ७० लाभार्थ्यांनां श्री कपिलानंद प्रतिष्ठान द्वारा महिलां लाभार्थ्यांना साडी-चोळी ,थंडीच्या दिवसामुळे उबदार चादर व पुरुष लाभार्थ्यांना कपडे ,एक उबदार चादर महाराजांच्या हस्ते देण्यांत आली आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0