संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई करून त्वरीत अटक करण्यांची मागणी
संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई करून त्वरीत अटक करण्यांची मागणी
चाकूर ता.प्रः- तालूक्यातील मोहदळ येथील आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मयताचे प्रेत चाकूर पोलीस स्टेशनमध्ये ठेऊन ठिय्या केला.यावेळी संबंधित गुन्हेगारावर कडक कारवाई करून त्वरीत अटक करण्यांची मागणी केली.यावेळी पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत त्वरीत कारवाई करीत गुन्हेगारा विरूध्द गुन्हा नोंदवुन तातडीने अटक केली जाईल असे सांगीतल्या नंतर मयताचे प्रेत अंत्यविधीस नातेवाईक घेऊन जाऊन मोहदळ या गावी अत्यंसंस्कार करण्यांत आले.
याबाबत अधिक माहीती अशी की,पोलीस स्टेशन मध्ये आमच्या विरोधात तक्रार का दिली म्हणुन दिंनाक १८ ॲाक्टोबंर रोजी रात्री ८.०० ते ८.३० च्या दरम्यान अर्जून सुर्यकांत निकम (वय ३४)यास मोहदळ येथील मारूती मंदीरा समोर १)गौरव ऊर्फ ज्योतीबा निकम,३)चंद्रकांत नामदेव निकम,३)सवीता चंद्रकांत निकम,४)कृष्णा चंद्रकांत निकम या चौंघानी काठ्यांनी जबर मारहाण केली त्यात त्याच्या डोक्यावर काठीने मारल्याने अर्जून हा बेहोश झाला होता.गावातील कांही लोकांनी भांडण सोडवून माझ्या पतीस लातूर येथील सह्याद्री हाॅस्पीटल मध्ये ॲडमीट केले.असा जवाब पल्लवी अर्जून निकम यांनी चाकूर पोलीस स्टेशन मध्ये दिला त्यानुसार चौघावर चाकूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दिंनाक १९ ॲाक्टोबंर रोजी कलम ११९,११८ (२),३५२,३(५) नुसार नोंद केला होता.
दरम्यान दिंनाक २७ नोव्हेंबर रोजी गंभीर जखमी अर्जून सुर्यकांत निकम (वय ३४) यांचे लातूर येथील सह्याद्री हाॅस्पीटल मध्ये उपचार चालू असताना रात्री ८.४५ वाजता निधन झाले,दिंनाक २८ नोव्हेंबर रोजी लातूर येथील शासकीय दवाखान्यांत पोस्टमार्टन करण्यांत आले.मयत अर्जुन यांच्या प्रेतासह अॅबुलन्स आई-वडील-पत्नी-नातेवाईक -ग्रामस्थ यांनी चाकूर पोलीस स्टेशन मध्ये टिय्या मांडून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयताचे वडील सुर्यकांत निकम यांनी केली तसेच आरोपी विरोधात कडक कारवाई करून त्वरीत अटक करण्यांची मागणी केली.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पी.एल.निळकंठ,पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून आरोपी विरूध्द कलम १०३ (१) बीएनएस मध्ये वाढ करण्यांत आली.तसेच आरोपी विरूध्द कडक कारवाई करून अटक करण्यांचे सांगीतल्या नंतर हे प्रकरण निवळले.
शोकाकुल वातावरणात अंत्यविधीः-
मोहदळ या गावी सांयकाळी ६.०० वाजण्यांच्या सुमारास शोकाकुल वातावरणात मयत अर्जून सुर्यकांत निकम यांचा अंत्यविधी करण्यांत आला.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,आई,वडील,एक भाऊ,एक बहीण असा परिवार आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0