लातूर क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो सभा मंडपाचे भूमिपूजन
लातूर क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो सभा मंडपाचे भूमिपूजन
लातूर ः दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान लातूर क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोच्या सभा मंडपाचे भूमिपूजन लातूर क्रेडाईचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, सचिव संतोष हत्ते, एक्स्पो प्रोजेक्ट चेअरमन उदय पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या वेळी एमसीएम कमिटी मेंबर क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुबोध बेळंबे, दीपक कोटलवार, सहसचिव क्रेडाई महाराष्ट्र धर्मवीर भारती, एमसीएम मेंबर नागनाथ गित्ते, कोषाध्यक्ष आशीष कामदार, ओबी समिती उपाध्यक्ष अमोल मुळे, किरण मंत्री, महेश नावंदर, सहसचिव श्रीकांत हिरेमठ, विष्णु मदने, युथ विंग समन्वयक - आकाश कोटलवार, वुमन विंग समन्वयक सौ. रिचा नावंदर आदींची उपस्थिती होती.
लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर लातूर क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा एक्स्पो यशस्वी करण्यासाठी क्रेडाईचे सर्वच मेंबर अहोरात्र प्रयत्नशील असून, हा एक्स्पो भूत न भविष्यति असा व्हावा यासाठी सर्वांचा सामूहिक प्रयत्न सुरू आहे. यासाठी क्रेडाई मेंबरच्या सहकार्यातून वेगवेगळ्या कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक सदस्यांना या एक्स्पोची जबाबदारी देण्यात आली असून, ती अतिशय स्वयंस्फूर्तपणे यशस्वी करीत आहेत. लातूरकरांना एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असा या एक्स्पोमागचा उद्देश आहे.
तीन दिवसीय चालणाऱ्या एक्स्पोमध्ये व्यावसायिकांसोबतच ग्राहकांना आपल्या पसंतीची व परवडतील अशी घरे उपलब्ध करून देण्यावर क्रेडाई सदस्यांचा भर असून, लातूरकरांना अत्याधुनिक व चांगल्या सोयी असलेल्या साईट्स यानिमित्ताने पाहता येतील. आपल्या आवडीनुसार घरे विकत घेण्यासाठी संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0