ज्युनिअर आणि मिस महाराष्ट्र फॅशन शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्युनिअर आणि मिस महाराष्ट्र फॅशन शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : येथील विशाल गिरी अॅक्टींग डान्स अकॅडमी आणि भारती बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर आणि मिस महाराष्ट्र फॅशन शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम औसा रोडवरील बिडवे लॉन्स याठिकाणी संपन्न झाला.
विशाल गिरी अॅक्टींग डान्स अकॅडमीच्या वतीने लातुरात यापूर्वीही अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले गेले होते आणि त्याला लातूरकरांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळाला होता. लातूरच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात विशाल गिरी अकॅडमीने एक वेगळा ठसा उमटविण्याचे काम केले आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोचे उदघाटन लातूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका अहिरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. धर्मवीर भारती , सुधीर देशमुख , भागीरथी गिरी मॅडम, बॉलिवूड कोरोग्राफर, संजय यादव , मॉडेलिंग ट्रेनर अर्चना सूर्यवंशी मॅडम, भारती बिल्डर्सच्या संचालिका सुरेखा भारती मॅडम, सचिन मोरे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हा फॅशन शो सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य होता.
लातूरच्या रसिक प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबियांसह या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला. १७ ते ३० वयोगटात मिस महाराष्ट्र पहिला क्रमांक हा पुणे शहराने पटकावला आहे. विजेत्यांना ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. दुसरा क्रमांक हा पंचगणी शहराने आणि तिसरा क्रमांक या लातूर शहराने पटकावला.
ज्यूनियर मिस महाराष्ट्र
१० ते १६ या वयोगटात पहिला व दुसरा क्रमांक हा लातूर शहराने पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे पाच व तीन हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील तिसरे पारितोषिक अंबाजोगाई शहराने पटकावले.
किड्स महाराष्ट्र ४ ते ९ या वयोगटात पहिला क्रमांक हा धाराशिव या शहराने पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक लातूर शहराने पटकावला. सर्व विजेत्यांना ट्रॉफी, क्राऊन, रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. . सर्व मॉडेल्सला आणि गेस्ट ला आपल्या कॅमेरात कॅप्चर करण्याचे काम हे भारतीय स्टुडिओचे संचालक बाळासाहेब भारती यांनी केले. या फॅशन शो बद्दल अधिक माहिती देताना शो चे डायरेक्टर विशाल गिरी यांनी या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्यात आल्याचे सांगितले. हा शो सर्वांगसुंदर आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा यासाठी संयोजकांच्या वतीने सर्वतोपरी परिश्रम घेण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे विशाल गिरी यांनी कौतुक केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0