दयानंद कला महाविद्यालयात ध्यानधारणा दिवस उत्साहात साजरा
दयानंद कला महाविद्यालयात ध्यानधारणा दिवस उत्साहात साजरा
दयानंद कला महाविद्यालय लातूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्रीरामचंद्र मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस दयानंद कला महाविद्यालय सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दयानंद वरिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी आणि प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. दिलीप नागरगोजे तसेच पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष कदम व प्रा.विलास कोमटवाड यांची उपस्थिती होती.
श्रीमती अंजली पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात असे प्रतिपादित केले की , सुखी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी निरोगी हृदयाची गरज असते आणि त्याकरिता ध्यानधारणा आवश्यक आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना ध्यान धारणेचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा.विलास कोमटवाड, प्रा.दिनेश जोशी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. मनोज गवरे, प्रा. अनिल भूरे तसेच सूत्रसंचालन स्वयंसेवक सुरज गोरे व आभार स्वयंसेवक निखिल पवार यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी मेहनत घेतली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0