तालुक्यातील पोषक वातावरणामुळे शहरातील हरभरा,तुर,गहू जोमात!
तालुक्यातील पोषक वातावरणामुळे शहरातील हरभरा,तुर,गहू जोमात!
रब्बी हंगामातील पोषक वातावरणामुळे हरभरा पिके बहरू लागली
तालुक्यातील पोषक वातावरणामुळे शहरातील हरभरा,तुर,गहू जोमात!
चाकुर ता.प्रः-रब्बी हंगामातील पोषक वातावरणामुळे तालुक्यातील नळेगांव, वडवळ नागनाथ, झरी , चापोली, नायगांव , या परिसरातील हरभरा, गहू, तुर यासारख्या पिकांना पोषक वातावरण असल्याने परिसरातील पिक बहरली असल्याने शेतकऱ्यांच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे
चाकुर तालुक्यातील , नळेगाव, जानवळ , घारोळा,घरणी,वडवळ नागनाथ या परिसरातील एकुण जमिनीच्या क्षेत्र फळा पैकी सर्वात जास्त क्षेत्र जिरायती जमिनीचे आहे. त्या मुळे या परिसरातील शेतकरी अतिशय काबाडकष्ट करीत. प्रतीवर्षांमध्ये येथील शेतकरी नगदी पिकांच्या लागवडीकडे ज्यास्त प्रमाणात भर देत असतो. येथील शेतकरी आर्थिक बजेटचे नियोजन करीत वर्षभराची पुंजी खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनांवर अवलंबून असतो. त्यामूळे या परिसरातील शेतकरी आर्थिक बजेटचे नियोजन करीत. सोयाबीन, उडीद, मूग तुर या सारख्या नगदी पिकांची लागवड करण्यासाठी सातत्याने कल असतो. परंतू यंदाच्या खरिप हंगामा वेळी जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात लवकर काही पाऊस झाला नाही. तरी येथील पिके ही अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरीमुळे पिकचांगली बहरत गेली होती. परंतू जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या परिसरातील काही भागातील मुग, उडीद ऐन शेंगांच्या भरात भरत असतांना सततच्या झालेल्या पावसामुळे मुग उडीद या सारख्या पिकाच्या उत्पादनात विक्रमी तुट झाली.आहे तर दुसरीकडे सोयाबीन या पिकावर 'येलोमोझ्यॉक' सारखा बुरशी नाशक रोगांमुळे पिकांच्या उत्पादनामध्ये विक्रमी घट झाली तर दुसरीकडे राज्य शासनाने विक्रमी घट झालेल्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळाला नसल्याने. या परिसरात तील शेतकर्याला घरात साठवून ठेवलेले सोयाबीन दिवाळीच्या शुभमुर्हतावर कवडीमोल भावाने परिसरातील आडत व्यापार्याना देण्याची वेळ येथील जिरायत जमीनदारावर आली. परतू येथील शेतकरी खरिप हंगामातील नगदी पिकांच्या उत्पादनात झालेली विक्रमी तुट भरुन काढण्या साठी हरभरा, टाळकी ज्वारी, या सारख्या पिकांची लागवड केली असुन सध्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून हरभरा, गहू, ज्वारी, तुर ,आदि पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सध्या या परिसरातील हरभरा, बडी ज्वारी, तुर, गहू आदि पिके ही शेती शिवारात
बहरु लागल्याने खरिप हंगामातील पिकांच्या उत्पादनात विक्रमी झाले रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनातून नक्कीच भरुन निघेल अशाळ भुत आशेने तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0