अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी विशेष कार्यक्रम
अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी विशेष कार्यक्रम
लातूर, दि. १७ : अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्यावैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यासाठी १८ डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने १८ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक स्वयंसेवी गट, विद्यार्थी यांच्यासाठी भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके वितरीत करावीत. तसेच व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादी कार्यक्रम आयोजित करविएत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
****
गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर मिळणार गटई स्टॉल
• ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. १७ : अनुसूचित जातीमधील गटई काम करणाऱ्या कामगारांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये १०० टक्के अनुदानावर गटई स्टॉल देण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक व पात्र व्यक्तींनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी आणि अनुसूचित जातीमधील असावा. अर्जदाराचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी ४० हजार रुपये व शहरी भागासाठी ५० हजार रुपयेपर्यंत असावे. अर्जदाराने सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गटई स्टॉल लावण्याच्या जागेचा आठ अ उतारा अथवा विहित नमुन्यातील भाडे करारनामा असणे आवश्यक आहे.
या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी डालडा फॅक्टरी, गुळ मार्केट, लातूर येथे सादर करावेत. अनुसूचित जातीमधील जास्तीत जास्त गटई कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चिकुर्ते यांनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0