परभणी येथील दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
परभणी येथील दोषी पोलिसांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
देगलूर तालुका प्रतिनिधी
परभणी येथे संविधानाचे केलेल्या अवमानानंतर घडलेल्या दंगलीत अनेकांगी रूप दिसून आले. कार्यवाहीच्या नावावर पोलिसांची अमानुषता मोठ्या प्रमाणात दिसून आली. ज्याचे प्रत्यंतर म्हणजे वडार युवक सोमनाथ सूर्यवंशी यांना जीव गमवावा लागला.
परभणी येथील दंगलीत कथित आरोपीच्या मोबाईल मधून मोबाईल क्रमांक घेऊन दंगलीशी कसलाही संबंध नसताना विनाकारण सूडबुद्धीने परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यास ताब्यात घेऊन त्यावर अत्याचार केला. या अमानुषते सदरील युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप निवेदकांनी केला आहे.सोमनाथ सूर्यवंशी हा पुणे येथील रहिवासी असून कायदा व पी.एच.डी.च्या शिक्षणासाठी परभणी येथे राहत होता. पोलिसांच्या कृरतेचा बळी ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारास 50 लाख रुपयांची मदत करावी. दोषी पोलिसावर तात्काळ सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. शिवाय दंगल पेटल्यापासून सदर वडार युवकाला अटक होईल करून त्याचा मृत्यू होईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासाव्यात यातून सत्यता बाहेर येईल अशी मागणी निवेदकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर येथे केली आहे.
संविधानाप्रती वडार समाज निष्पक्षपणे उभा असून संविधानाचा अवमान कदापि सहन केला जाणार नसल्याची भावना यावेळी व्यक्त केली. याशिवाय शासनाने सदरील अर्जाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र लक्षवेधी आंदोलनाला सामोरे जावे लागेल अशी सूचनाही सबंध वडार समाजाने यावेळी केली. निवेदनावर वडार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पवार, सुभाष अल्लापुरकर मराठवाडा अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती, मिलिंद शिकारे, विठ्ठल भंडरवार, दंडलवार ईश्वर,यादव ढाले, संजय जोशी, हनुमंत देगलूरकर, शेख महेबूब, नागेश पलपवार, अजीम अन्सारी, बालाजी गंदपवार, गंगाधर भुयारे,अमोल शिंदे आदींच्या सह्या आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0