ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा
ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रति वर्षाप्रमाणे संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था समन्वयक कुलदीप हाके पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. गोपाल जोशी ढाळेगावकर , सहशिक्षक बालाजी फुलमंटे, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दुपारी ठीक बारा वाजता गुलाल उधळण्याचा कार्यक्रम व ज्ञानेश्वर माऊली ची महाआरती करण्यात आली. यावेळी प्रवचनकार गोपाल जोशी यांनी संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जीवन वृत्तांत उपस्थित सर्व पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ठेवला. अध्यक्षीय समारोप करताना कुलदीप हाके यांनी पसायदानाचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगितला.
संत ज्ञानेश्वर , निवृत्तीनाथ, मुक्ताई, सोपानदेव यांच्या वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन शारदा तिरुके यांनी तर आभार मीना तोवर यांनी मांनले. शेवटी पसायदान घेऊन व सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0