चित्ररथाद्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहात लातूर शहरात जनजागृती
चित्ररथाद्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहात लातूर शहरात जनजागृती
लातूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महाराष्ट्र शासन संस्था मार्फत १४ ते २० डिसेंबर दरम्यान लातूर शहरात ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला. लातूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी औद्योगिक, व्यापारी, तसेच घरगुती ग्राहकांसाठी ऊर्जा संवर्धनाच्या उपायांवर आधारित ध्वनी चित्रफिती ऊर्जा चित्ररथावर दाखविण्यात आल्या. यात सौरऊर्जेचा उपयोग, तसेच उर्जेचा कार्यक्षम वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली. ऊर्जा संवर्धन जागृती संदेश प्रदर्शित करणाऱ्या चित्ररथाला निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी विद्युत मंत्रालय ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो ऊर्जा मित्र लेखापरीक्षक केदार खमितकर, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण प्रकल्प अधिकारी पूजा धुमाळ व इतर शासकीय कर्मचारी उपस्थित होते. ऊर्जा संवर्धन सप्ताहअंतर्गत विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ऊर्जासंवर्धन व पर्यावरण संवर्धन’ या विषयावर निबंध, पोस्टर, व वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय,पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी विशेष जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आले. महाऊर्जा लातूर विभागीय महाव्यवस्थापक समीर घोडके व नोडल ऑफीसर शिल्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0