बिटरगाव येथील किशोरी क्रिडा महोत्सवात पि .एस. आय. जाधव यांचे प्रतिपिदन.
बिटरगाव येथील किशोरी क्रिडा महोत्सवात पि .एस. आय. जाधव यांचे प्रतिपिदन.
रेणापूर- किशोरवयीन जीवन हे प्रगतिशील जीवन आहे या जीवनामध्येच व्यक्तीच्या सर्वांगीण गुणाच्या विकासाची प्रक्रिया वेगवान चालू असते ,अशावेळी त्यांना सांघिक खेळामध्ये सहभागी होऊन स्वतःला व्यक्तिमत्व अधिक विकसित करण्याची संधी मिळते. नेतृत्व कौशल्य, पराजय सहन करण्याची कला, विजय आनंद साजरी करण्याची कला, संघटन कौशल्य इत्यादी महत्त्वपूर्ण कौशल्याचा विकास सांघिक खेळामधूनच निर्माण होऊ शकते आसे प्रतिपादन दिनांक १५ रोजी रविवारी कलापंढरी संस्थेच्या वतीने बिटरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कलापंढरी किशोरी क्रिडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस .जाधव यांनी केले.
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब कदम,अंकुश शेळके,वसंत यादव ,सविता कुलकर्णी,आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील किशोरी मुली मध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बि. पी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तालूक्यातील बिटरगाव येथे किशोरी क्रिडा महोत्सवाचे दिनांक १५ नोहेंबर रोजी रविवारी आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक जाधव बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले कि, अनेक ठिकाणी मुलांच्या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन केलेले असते परंतू आज या ठिकाणी कलापंढरी सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील किशोरी मुलींना खेळात आपले करीअर घडवण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करुन दिला आहे.या प्लॅटफॉर्मवर प्रतेक किशोरी मुलींनी यशस्वीरित्या पदार्पण करुन जीव ओतून खेळ खेळून यशस्वी व्हावे. आज या ठिकाणी किशोरी मुलीच्या क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, खोखो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या खेळातून जागतीक दर्जाचे खेळाडू घडले पाहीजेत. आशा खेळामध्ये सहभागी झाल्यामुळे नेतृत्व कौशल्य, पराजय सहन करण्याची कला, ईत्यादी महत्वपुर्ण कौशल्याचा विकास होऊ शकतो त्याच बरोबर पालकांनी किशोरवयीन बालक बालीकांना सांघिक खेळाचे महत्व सांगितले पाहीजे व सहभागी होण्याची प्रेरणा दिली पाहिजे. प्रतेक किशोरी मुलींनी आपले खेळांमध्ये करीअर निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल राहिल्यास नक्कीच यश आपलेच आसेल आशी भावना ठेऊन प्रतेक खेळ आवडीने खेळला जावा असेही प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक आर एस जाधव यांनी केले.
आयोजीत करण्यात आलेल्या क्रिकेट,खोखो,कब्बडी स्पर्धेमध्ये पानगाव, बिटरगाव, वडवळ, आदी सह इतर गावातील किशोरी मुली सहभागी झाल्या होत्या.यशस्वीतेसाठी सविता कुलकर्णी, शिवदर्शन सदाकाळे, जयवंत जंगापल्ले, मधुकर गालफाडे, वैभव क्षीरसागर, शालूताई साके, फराना शेख, आदींनी परीश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते संघ
क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारीतोषिक बिटरगाव संघ, द्वितीय वडवळ,त्रतिय पानगाव, तर खो खो स्पर्धेचे प्रथम पारीतोषिक बिटरगाव,व्दितीय वडवळ, तर कब्बडी मध्ये प्रथम पारीतोषिक बिटरगाव, व्दितीय वडवळ, तर त्रतीय पारीतोषिक पानगाव संघाने पटकावले.सर्व यशस्वी संघाचे अभिनंदन करुन त्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपञ देण्यात आले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0