लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
लातूर, दि. १८ : अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यासाठी १८ डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक अरविंद कांबळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अफसर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कौशल्य विकास, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक बालाजी मरे यांच्यासह अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
अल्पसंख्यांक समाजासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करावी. तसेच पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही गतीने करावी, असे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.
अल्पसंख्यांक विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणारी विविध विकास कामे, अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत गेल्या चार वर्षात मंजूर कामांची माहिती त्यांनी दिली. तसेच धार्मिक अल्पसंख्यांक खासगी शाळा पायाभूत सोयी सुविधा योजना व डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून 2018-19 ते 2024-25 पर्यंतच्या योजनांचा तसेच अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाल उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0