शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डिजिटल साक्षर होण्याची गरज - प्र.प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डिजिटल साक्षर होण्याची गरज - प्र.प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे
लातूर : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डिजिटल साक्षरतेबरोबर सॉफ्ट स्किल आणि अत्याधुनिक कार्यालयीन एप्लीकेशनचा वापर करावा.कारण बदलत्या काळानुसार डिजिटल साक्षर होण्याची खरी गरज आहे,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी केले.
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे दि.१९ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित "शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरता विकसित करणे ' या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले.मागील १० वर्षांपासून संगणकशास्त्र विभागातर्फे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी या प्रशिक्षण कार्यशाळेचे दरवर्षी आयोजन केले जाते.या प्रशिक्षण कार्यशाळेत डिजिटल साक्षरताबरोबर सॉफ्ट स्किल आणि बेसिक इंग्लिश स्पिकिंग या विषयाचेसुद्धा प्रशिक्षण देण्यात येत आहे.
याप्रसंगी संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे,संगणकशास्त्र विभाग समन्वयक डॉ.संगीता जाजू,कार्यशाळा समन्वयक प्रा.अरुणा चौधरी,कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आणि बन्सी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रोहिणी शिंदे यांनी केले तर आभार कार्यशाळा समन्वयक प्रा.अरुणा चौधरी यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.वैभव कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी प्रा.सुजाता काळे,प्रा.कृष्णा सारडा,प्रा.सुमित जोशी,प्रा.पूजा नंदगावे,प्रा.आशा बोराडे,प्रा.दीपाली दाडगे,प्रा.साजिया फरीन, प्रा.विजय पवार,प्रा.गोविंद बांगड, प्रा.आदित्य सूर्यवंशी,प्रा.प्रतीक मुसमाडे,प्रियंका हिप्परकर,मानसी गायकवाड,राहुल बनभेरू यांच्यासह इतर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0