मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना यांना निवेदन ! तहसिलदार नरसिंग जाधव यांनी निवेदन स्वीकारले
मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना यांना निवेदन ! तहसिलदार नरसिंग जाधव यांनी निवेदन स्वीकारले
चाकूर ता.प्रः-मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने चाकूर तालूक्याचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिंनाक १६ डिंसेबंर रोजी निवेदन देण्यांत आले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालूक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष (अण्णा) देशमुख यांचे अपहरण करून अतिशय निर्घन पणे हत्या कांही समाज कंटका कडून दिंनाक १२ डिसेंबर रोजी करण्यांत आलेली आहे.या घटनेचा जाहीर निषेध सकल मराठा समाजा कडून करण्यात आला आहे.या हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव आणि पोलीस निरीक्षक दत्ताञय निकम यांना देण्यात आले आहे.
चौकटः-
दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभा अधिवेशनात या हत्या प्रकरणी लक्षवेधी मांडून हत्या प्रकरणी संबधीत आरोपीना तात्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0