तपासणी शिबिराचे आयोजन
तपासणी शिबिराचे आयोजन
लातूर : रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथील श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठ आणि लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी डोळ्यांच्या आजारासंबंधी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये तिरळेपणा, काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्यावर पडदा येणे, कमी दिसणे आदी नेत्र विकारांबाबत मोफत तपासणी केली जाणार आहे. या नेत्र तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. रुग्णांनी आपली नाव नोंदणी रमेश तुकाराम मद्दे यांच्याकडे दि. २३ डिसेंबर २०२४ पर्यंत करावी. तसेच नाव नोंदणी साठी येतेवेळी सोबत आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि मोबाईल नंबर द्यावा. हे शिबीर पाथरवाडी येथील श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठ या ठिकाणी सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री महादेव आणि हनुमान मंदिर अध्यात्मिक पीठ आणि विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0