राजकीय दबावापोटी गरिबावर गंडांतर
राजकीय दबावापोटी गरिबावर गंडांतर
लातूर: येथील आनंद नगर भागातील नितीन वाघमारे (वय वर्ष 32 व्यवसाय मजुरी) हे घरासमोरील रस्त्यावर उभे टाकले असता अचानकपणे त्यांच्यावर रत्नदीप हिरामण बानाटे याने पूर्व-वैमनस्यातून कुऱ्हाडीने हल्ला चढवत बेदम मारहाण केली त्यात नितीन वाघमारे यांचा एक हात व पाय फ्रॅक्चर झाले असून शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे परंतु याबाबत विशेष माहिती अशी की रत्नदीप हिरामण बानाटे यांचे राजकीय संबंध असल्याकारणाने पोलिसांवर दबाव आणून नितीन वाघमारे व त्यांच्या कुटुंबियां विरोधात परस्पर फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे खात्रीलायक वृत्त समजले आहे. त्यामुळे आनंदनगर भागातील नागरिकात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून रक्षकच भक्षक बनल्याचे बोलले जात आहे. यामुळे वाघमारे यांना खरंच न्याय मिळतो का हे पाहणे गरजेचे आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
पूर्व वैमनस्यातून बेदम मारहाण परस्पर गुन्हे दाखल, राजकीय दबावापोटी गरिबावर गंडांतर
October 04, 2024
Comments 0