मरशीवणी येथील कोरड्या दुष्काळामुळे सुकलेल्या पिकांचे ग्रामस्तरीय समितीकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे सुरू
मरशीवणी येथील कोरड्या दुष्काळामुळे सुकलेल्या पिकांचे ग्रामस्तरीय समितीकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे सुरू
“आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर; घाबरून न जाता सहकार्य करण्याचे ग्रामस्तरीय समितीचे आवाहन”
मरशिवणी (दि. ०२ ऑक्टोबर २०२६):
सलग दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मौ. मरशिवणी व मरशिवणी तांडा परिसरातील सोयाबीन, कापूस आणि तूर ही खरीप पिके पूर्णपणे वाळली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आज, शुक्रवार दि. ०२/१०/२०२६ रोजी ग्रामस्तरीय समितीने प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर (शेतावर) भेट देऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
शासकीय उपाययोजना राबवून मदत देणार
या पाहणीदरम्यान ग्रामस्तरीय समितीने बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. "पावसाच्या दीर्घ खंडामुळे उद्भवलेल्या या आस्मानी संकटात शेतकऱ्यांनी खचून वा घाबरून जाऊ नये. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या सर्व उपाययोजना आणि सवलती प्रत्यक्ष स्तरावर राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल," असा ठाम विश्वास समितीच्या वतीने गावकऱ्यांना देण्यात आला.
महत्त्वाचे आवाहन: फार्मर आयडी आणि कागदपत्रे
यावेळी बोलताना ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप 'फार्मर आयडी' (Farmer ID) काढलेला नाही, त्यांनी तो तात्काळ काढून घ्यावा. तसेच, ज्या शेतकऱ्यांची जमीन सामूहिक किंवा सामायिक आहे, त्यांनी नियमानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे त्वरित समितीकडे जमा करावीत, जेणेकरून मदतीचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
चारा, पाणी व मजुरांच्या हाताला कामाबाबत चर्चा
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि मजुरांच्या हाताला काम (रोजगार) उपलब्ध करून देण्याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी मंचक परतवाघ यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली आणि स्थानिक पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
पंचनामा व पाहणीच्या वेळी ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार, सहाय्यक कृषी अधिकारी मंचक परतवाघ यांच्यासह संजय गुणाले, प्रभाकर जाधव, रामकिसन आमुगे, गणपत दोडे, उमाकांत गुणाले, पंडित दोडे, थावरु जाधव, बालाजी जाधव, उत्तम राठोड, तुकाराम चव्हाण, गजानन कदम, व्यंकट कदम, हणमंत दोडे, हरिराम श्रीरामे, संतोष पांचाळ, बालाजी गुणाले, ई-पीक पाहणी सहाय्यक इंद्रजित गुंडरे, तुकाराम सांगविकर, श्रीराम आमुगे, धर्मराज कदम, बालाजी गुणाले, मसनाजी आमुगे, बालाजी गुंडरे , भारत राजपंगे, सुभाष दोडे, रामजी श्रीरामे, दिपक जाधव, दत्तात्रय दोडे यांच्यासह मरशिवणी व मरशिवणी तांडा येथील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने
धर्मराज कदम, हनुमान दोडे, श्रीराम आमुगे, उमाकांत कदम, राजपाल कदम, दत्ता दोडे, राम जी श्रिरामे, तुकाराम चव्हाण, धनंजय गुणाले आदी ची उपस्थीत होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
Comments 0