अखिल भारतीय पोलीस स्पर्धामध्ये नांदेड पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी
अखिल भारतीय पोलीस स्पर्धामध्ये नांदेड पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी
महाराष्ट्र राज्य पोलीस दल यांचेतर्फे मुंबई येथे पहिली अखिल भारतीय पोलीस बॅडमिटन क्लस्टर 2024-2025 केरळ या स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आलेली होती. सदर पोलीस स्पर्धा निवड चाचणी मध्ये टेबल टेनिस या प्रकारात नांदेड पोलीस दलातील पोलीस अंमलदार पोडेकों/2146 मिलींद माणिकराव लोणे, नेमणुक पोलीस मुख्यालय नांदेड, यांची एकेरी टेबल टेनिस स्पर्धा तसेच महिला पोलीस अमंलदार मपोहेकॉ/963 सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे, नेमणुक शवाशा वजिराबाद नांदेड, यांची मिक्स दुहेरी टेबल टेनिस या प्रकारात निवड करण्यात आली होती. सदर स्पर्धा हि दिनांक 11.04.2025 ते दिनांक 15.04.2025 दरम्यान केरळ राज्यातील कोची येथील राजीव गांधी स्टेडियम मध्ये घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये नांदेड पोलीस दलातील पोलीस अंमलदार पोडेकॉ/2146 मिलींद माणिकराव लोणे, नेमणुक पोलीस मुख्यालय नांदेड, यानी एकेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग घेवून कांस्य पदक पटकावले तसेच महिला पोलीस अमंलदार मपोडेकॉ/963 सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे, नेमणुक शवाशा वजिराबाद नांदेड, यांनी मिक्स दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून नांदेड पोलीस दलाचे नावलौकीक वाढविले आहे. सदर यशाबदल मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, श्रीमती डॉ. आश्विनी जगताप, पोलीस उपअधीक्षक (गृह) यांनी सदर पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले असुन शुभेच्छा दिल्या आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
Comments 0