पुष्पूलवार यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा
पुष्पूलवार यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा
नांदेड/ प्रतिनिधी- देगलूर तालुक्यातील अवैध रेती तस्करीसाठी सहकार्य करण्याचा आरोप असलेले वादग्रस्त मंडळ अधिकारी बालाजी पुष्पूलवार यांच्यासह तिघांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे मालकी शेतजमिनीचा अवैधरित्या फेरफार केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर साक्षी पुरावे ग्राह्य धरून देगलूर प्रथम सत्र न्यायालयाने फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देगलूर पोलीस ठाण्याला दिले आहेत.
देगलूर तालुक्यातील मौजे अल्लुर येथील शेत जमीन क्रमांक 20 ही तक्रारदार सरस्वती हनुमंत पटणे यांची आई गंगाबाई लक्ष्मण पडगे यांच्या नावाने होती. इतर अधिकारांमध्ये तक्रारदार सरस्वतीबाई, परबतबाई, शोभाबाई आणि शांताबाई यांच्या नावे सातबारावर नोंद होती. परंतु तक्रारदाराचे बंधू चंद्रकांत लक्ष्मण पडगे यांनी संबंधित मंडळाधिकारी बालाजी माधव पुष्पलवार व इतरांशी संगणमत करीत तक्रारदार व शांताबाई यांचे आधार कार्ड मध्ये खाडाखोड करून त्यांचे नावे असलेली जमीन फेरफार करून घेतला. ही बाब कळल्यानंतर तक्रारदार सरस्वती हनुमंत पटणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे 27 मार्च 2024 रोजी तक्रार केली परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने देगलूर प्रथम सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.
सरस्वती हनुमंत पटणे यांच्या याचिकेवर साक्षी पुरावे ग्राह्य धरून देगलूर प्रथम सत्र न्यायालयाने चंद्रकांत लक्ष्मण पडगे यांच्यासह शहापूरचे मंडळ अधिकारी बालाजी माधवराव पुष्पलवार यांच्यासह दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मंडळ अधिकारी बालाजी पुष्पलवार यांच्यावर मनसे तालुकाध्यक्ष मन्मथ परबते यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पदाचा गैरवापर करीत अवैध रेती तस्करीला सहकार्य केल्याचा आरोप तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होती परंतु कारवाई झाली नव्हती. न्यायालयाच्या या आदेशामुळे भ्रष्ट अधिकाऱ्याचे पितळ उघडे झाल्याचे बोलल्या जात आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
Comments 6
liHevoWyTqpmkIBzUlCjHUYx
xbxnMSULwnFVywCwERXgwDq
wXIsSaKkFauFnMOq
FDPjAFUYlmmOlmibshmPOX
rTTXsaWgDAYloCZwnVRBcwx
tyjCsZijdGJMVMohIgvhM
GrYBaXOEeBpEFRYqmPydZAs
tDfAcXCmQaejzqBqhOJsNIHN
kaJfSPdhZUPNUuHccDtm
jcBmSjiPCIbfsOrOwuMOOy
QbsyMlbxDCWKjLRVRm
YedFnklZWbLBBbrbgk